Take a fresh look at your lifestyle.

कृष्णा महाराज मते यांची निवड

0
maher

गुरुप्रसाद देशपांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नेवासे : महाराष्ट्रातील दत्त गुरूच्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज मते यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल शुक्रवार (दि.६) मे पंचसंस्कार दीक्षा विधी सोहळा होणार असल्याची माहिती श्री देवस्थानचे प्रमुख भास्करगिरीजी महाराज यांनी दिली.

सनातन वैदिक हिंदू धर्म रीतिरिवाजाप्रमाणे श्री क्षेत्र देवगड श्री दत्त मंदिर संस्थान येथील गुरू परंपरेनुसार श्री कृष्णा महाराज मते यांचा उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळा होणार आहे, शुक्रवार (दि.६) मे सकाळी ८ ते ११ यज्ञ मंडपामध्ये होमहवनादी नामकरण विधी कार्यक्रम होईल. सकाळी ९ ते ११ सावखेडा येथील गिरी आश्रमाचे प्रमुख कैलासगिरी महाराज यांचे कीर्तन होईल. सकाळी ११ ते ११.३० यावेळेत विशिष्ट पुज्यनिय संतांचे व मान्यवरांचे शुभ संदेश व ब्रम्हवृंदाचा शांतीपाठ श्रींची आरती होऊन महाप्रसाद वाटपाने पंच संस्कार दीक्षा विधी सोहळयाची सांगता होईल

पंचसंस्कार दीक्षा सोहळयाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळयाचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.