Take a fresh look at your lifestyle.

जेष्‍ठ नागरीकांचा लोणीत सत्‍कार

0

लोणी, ओटीटी न्यूज नेटवर्क

लोणी : लोणी बुद्रूक गावाची वाटचाल ही अनेक जेष्‍ठ नागरीकांच्‍या मार्गदर्शनाने सुरु आहे. या गावाचा विकास साध्‍य होण्‍यात जेष्‍ठ नागरीकांचे योगदान मोलाचे असल्‍याचे प्रतिपादन माजीमंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधून लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीच्‍यावतीने गावातील जेष्‍ठ नागरीकांचा सत्‍कार आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्‍यात आला होता. माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील, सिनेट सदस्‍य अनिल विखे, लक्ष्‍मण बनसोडे, सरपंच कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, ट्रक्‍स वाहतुक संस्‍थेचे चेअरमन नंदू राठी, भाऊसाहेब धावणे, भाऊसाहेब विखे, प्रविण विखे, संतोष विखे, यांच्‍यासह पदाधिकारी, ग्रामस्‍थ याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, कुटुंबात किंवा समाजात जेष्‍ठ नागरीक हे सर्वांचे आधार असतात त्‍यांच्‍या मार्गदर्शनानेच आपल्या पुढील पिढीची वाटचाल सुरु असते. लोणी बुद्रूक गावाच्‍या जडणघडणीत अनेक जेष्‍ठ नागरीकांचे योगदान आणि मार्गदर्शन मोलाचे ठरल्‍यामुळेच हे गाव एक परिवार म्‍हणून अनेक वर्षे कार्यरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.