Take a fresh look at your lifestyle.

खडका सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भोरे; व्हाईस चेअरमन देशमुख

0
maher

गुरुप्रसाद देशपांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नेवासे : खडका विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रजनीताई भोरे तर व्हाईस चेअरमनपदी सलीमभाई देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या खडका विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी विकास पॅनलच्या भोरे यांची चेअरमनपदी तर देशमुख यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. चेअरमनपदाची सूचना संजय रघुनाथ भांगे यांनी मांडली तर त्यास विलास मोहन पवार यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमनपदाची सूचना मोहन गणपत शिरसाट यांनी मांडली तर त्यास बबन त्रिंबक भांगे यांनी अनुमोदन दिले

सदर निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून आर एम जहागीरदार व राजाराम कारले यांनी काम पाहिले. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवृत्ती धोपटे, गणेश गोरे, गोरक्षनाथ भांगे, माऊली पवार, संभाजी भांगे, वसंतराव भांगे, सुनिल पवार, सतीश भांगे, भाऊसाहेब कराळे, सचिन कराळे यांनी विशेष प्रयत्न केले या निवडीनंतर ना.गडाख व सुनीताताई गडाख यांनी तसेच सभापती कांगुणे व नानासाहेब तुवर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.