Take a fresh look at your lifestyle.

चन्नाप्पा महाराज शेतकरी पॅनेलचा प्रचार सुरु

0
maher

अशोक निमोणकर, ओटीटी न्यूज नेटवर्क

जामखेड : तालुक्यातील पिंपळगाव उंडा सेवा संस्थेची निवडणूक राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठेची समजली जाते. या निविडणुकीत चन्नाप्पा महाराज शेतकरी पॅनेलचा प्रचाराचा नारळ सभासद, कार्यकर्ते व उमेदवारांच्या उपस्थित ढोलताशांच्या गजरात आपटी व पिंपळगाव उंडा ग्रामदैवतला नारळ वाढून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

पिंपळगाव उंडा येथे चन्नाप्पा महाराज व नगद नारायण महाराज, मारूती व आपटी येथील म्हसोबा व मारूतीला अभिवादन करून प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. यावेळी आपटी ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार गोरे, वाघा गावचे सरपंच श्याम बारस्कर, पिंपळगाव उंडा सोसायटीचे चेअरमन सतिश ढगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास मोरे यांच्या उपस्थितीत उमेदवार अनिल बारस्कर, अशोक बारस्कर, विलास बारस्कर, भास्कर ढगे, सतिश ढगे, तात्या गोरे, बापूराव जगदाळे, भानुदास पवार, अनुराधा ढगे, कौशल्या ढगे, बुध्दीवंत साळवे, संजय ढगे, अजयकुमार बाराते यांनी नारळ वाढवला. यावेळी मोठय़ा प्रमाणावर शेतकरी सभासद, पॅनेलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रचाराचा नारळ वाढविण्यात आल्यानंतर अयोजीत सभेत वाघा गावचे सरपंच व पॅनेलचे नेते प्रा. श्याम बारस्कर म्हणाले, पिंपळगाव उंडा सोसायटी आपटी, वाघा व पिंपळगाव उंडा या तीन गावची मिळून आहे. मागील अनेक वर्षापासून संस्था सत्ताधारी मंडळाच्या ताब्यात आहे. या काळात संस्थेकडून कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक व दुजाभाव करण्यात आला नाही. या संस्थेने शासनाच्या विविध योजनेसाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले आहे. २००३ साली या संस्थेचे १२७ सभासद होते व साडेचोवीस लाख कर्ज वाटप केले होते. तर २०२१ रोजी सभासद संख्या ८८६ असून सव्वा चार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागेल त्याला कर्ज व सभासद केले जात असल्याने संस्था राज्यात नावारूपाला येईल त्यामुळे सर्व सभासदांनी कपबशी चिन्हावर शिक्का मारून विजयी करावे असे आवाहन सरपंच बारस्कर यांनी केले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विलास मोरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला व पॅनलच्या सर्व तेरा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. आपटीचे सरपंच नंदकुमार गोरे म्हणाले, आपटी वाघा व पिंपळगाव उंडा या ग्रुप सेवा संस्थेच्या कारभारावर सभासद खुश असून कोणत्याही सभासदाला संस्थेबाबत अडचण येणार नाही संस्थेचे अध्यक्ष सतिश ढगे अहोरात्र सभासदांच्या कामाला हजर असतात. यावेळी वैजीनाथ गवसणे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.