Take a fresh look at your lifestyle.

राज्यात सात हजार पोलिसांची भरती होणार! फडणवीसांची अधिवेशनात माहिती

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत एका रोचक सूचनेला उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.

“तर मी राजीनामा देईल! “दीपक केसरकरांची सिंहगर्जना; विरोधकांना दिले प्रत्युत्तर

राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहेत, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे.

विधानभवन परिसरात सत्ताधारी-विरोधक संघर्ष पेटला; सत्ताधारीदेखील झाले आक्रमक

नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याची चौकशी करण्यात येणार असून वरिष्ठ अधिकारी दोषी आढळल्यास त्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच एका अधिकाऱ्याची एकाच पदावर किंवा शहरात दीर्घकाळ नियुक्ती होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.