Take a fresh look at your lifestyle.

आता बारी मंत्री नारायण राणेंची; शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खलबतं!

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, फडणीवस यांच्या सभेनंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. दरम्यान, 17 मे पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा.

केवळ ‘हे’ App डाउनलोड करा – घेता येईल अनेक सरकारी सुविधांचा लाभ, असे होतील फायदे

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यात ते काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या ‘ठोक’सभेतील महत्त्वाचे मुद्दे

भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज गोरगाव येथील नेस्को सेंटरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी घेतलेल्या सभेला प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

Breaking News : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; राजद्रोह कायद्याला तूर्तास स्थगित

फडणवीस यांच्या ‘ठोक सभे’ला मुख्यमंत्री ठाकरेंचे एका ओळीत उत्तर

भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तर, ‘त्यांना गुरु शिष्याचे नाते सांगायची गरज नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी प्रत्युत्तर दिलं.

तुमच्या जिल्ह्याची प्रत्येक बातमी व्हॉट्सऍपला मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.