Take a fresh look at your lifestyle.

राज्यपालांच्या टोपीचा रंग अन्…राज्यपालांच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवार स्पष्टच बोलले

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – मुंबई येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर सर्वच समाजमाध्यमांद्वारे टीका सुरु आहे. टीकेची झोड उठली आहे. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

“या राज्यपालांबद्दल काय बोलावं. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. मी याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही,” असे शरद पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.