Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधानांची भेट घेऊन शरद पवारांनी ‘त्या’ तिघांचा केला करेक्ट कार्यक्रम! राज्याच्या राजकारणात खळबळ

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – ‘एकाच घरात राहून अजित पवारांच्या (ajit pawar) घरी ईडीची कारवाई झाली. मग सुप्रिया सुळे यांच्या घरी का होता. शरद पवार लगेच पंतप्रधान मोदींची भेट घेतात. अनिल देशमुख यांचा मार्ग मोकळा केला. नवाब मलिक (nawab malik) जास्त बोलताय, मग हे मोदींना भेटले. त्यानंतर मलिक जेलमध्ये गेले. आता संजय राऊत यांच्याबद्दल पवार मोदींना भेटले’ असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी गंभीर आरोप केला आहे.

ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
कोहिनूर मिलच्या व्यवहारात माझे नाव आले होते. त्या भानगडीतून मी बाहेर पडलो. नंतर ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवार यांनाही नोटीस येणार याची चाहूल लागली होती. त्यानंतर किती नाटक केलं. एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची कारवाई झाली. मग सुप्रिया सुळे यांच्या घरी का होत नाही. शरद पवार लगेच पंतप्रधान मोदींची भेट घेतात. अनिल देशमुख यांचा मार्ग मोकळा केला. नवाब मलिक जास्त बोलताय, मग हे मोदींना भेटले. त्यानंतर पुन्हा मोदींना भेटले आणि मलिक मध्ये गेले. आता संजय राऊत यांच्याबद्दल पवार मोदींना भेटले. संजय राऊतांना कुठे लटकवतील ना,कळणार सुद्धा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार सभेत शिवरायांचं नाव का घेत नाही?

यापेक्षा वेगळी भूमिका काय असू शकते. शरद पवार म्हणता मी जातीवादीचे राजकारण करतो. मी लोकांना भडकावतो. राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावे, राज ठाकरे भूमिका बदलतो म्हणून. सोनिया गांधी या परदेशी पंतप्रधान देशाला चालणार नाही, हे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यानंतर हाच धागा पकडून शरद पवार बाहेर पडले. 1999 ला बाहेर पडले आणि निवडणुकीचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. मी कोणती भूमिका बदलली? असा उलटसवाल राज यांनी केला.

एवढं झोंबलं की जातीपातीबद्दल बोललो की, 1999 साली राष्ट्रवादीचा जन्म झाला. जातीपातीचे राजकारण सुरू झाले. चुकीचा इतिहास सांगितला अशी टीका पवारांनी केली. राष्ट्रवादीने सी ग्रेड बिग्रेड संघटना काढली. त्या 1999 नंतरच कशा आल्यात. त्या पवारांनी काढल्यात. पुण्याच्या मुलाखतीत हा प्रश्न विचारला होता. शरद पवार जेव्हा जेव्हा भाषण करता तेव्हा हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा म्हणतात. पण, हा महाराष्ट्र जर कुणाचा असेल तर तो त छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. पवार कधीच सभेत शिवरायाचं नाव घेताना दिसत नाही. शिवरायांचं नाव घेतलं तर मुस्लिम मत जातील म्हणून ते नाव घेत नाही, असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी केला.

हिंदूत्वाची भूमिका आज नाही आणली. पाकिस्तानी कलावंताना लाथ घालून हकलून लावणारी संघटना कोणती होती. ही संघटना आमची होती. प्रत्येक प्रोड्यूसरला नोटीस आम्ही बजावली होती. आझाद मैदानावर जेव्हा रझा अकादमीने मोर्चा काढला होता, पोलीस भगिनींना मारलं होतं. त्यांना काय शारिरिक त्रास दिला होता. पत्रकारांच्या गाड्या जाळल्या, पोलिसांना मारलं कुणी बोललं नाही. त्यांच्या विरोधात मनसेनं मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलीस आयुक्त अरुण पटनायक होते, ते तिथे आले होते, त्यांनीच कुणाला हल्ला करायला सांगितले नव्हते. अरुण पटनायक यांना हटवण्यासाठी तेव्हा मोर्चा काढला होता, असा दावाही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.