Take a fresh look at your lifestyle.

बंडाच्या निर्णयाला आधार नाही! शरद पवारांकडून बंडखोरांना आव्हान

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाराष्ट्रात मोठ्या राजकीय नाट्यानंतर सत्ताबदल झाला. ज्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने सत्ता स्थापन केली.
दरम्यान, ठाकरे सरकार पाय उतार झाल्यानंतर आता शिंदे सरकार सत्तेत आलं आहे.

परिणामी, तर काही दिवसांपूर्वी सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी तसेच काँग्रेससह विरोधी बाकावर बसावं लागलं. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी तसेच सेना आणि काँग्रेस च्या नेत्यांनी बंडखोर आमदारांचा शिंदे गट आणि भाजप यांच्यावरील टिकसत्र सुरूच ठेवले.

महत्वाचं म्हणजे, आज राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी शिंदे गटातील आमदारांनी जे बंड केले आहे त्याला कोणताही आधार नाही असं पवार यांनी म्हटलं आहे. याशिवाय, पुढे या आणि जनतेला येऊन खरं कारण सांगा असं ठणकावून सांगितलंय.

काय म्हणाले शरद पवार?

तुम्ही बंड केलं; मात्र बंड करण्यामागचं खरं कारण तुम्ही सांगत नाहीत. बंडाच्या कारणामागे सांगितल्या जाणाऱ्या निर्णयाला आधार नाही. त्यामुळे या बंडखोरांना जनतेसमोर येऊन खरं कारण सांगावं लागेल, असं ते म्हणाले.

मध्यावधी निवडणुकांविषयी विचारले असता, मध्यावधी निवडणुका लागतील असं मी म्हणालो नाही. मात्र, पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असं मी सांगितलेलं आहे. आपल्या हातात दोन वर्ष आहे. हे लक्षात ठेऊन कामाला लागायला हवं. कारण, 2024 साली मविआने पुन्हा एकदा निवडणूक एकत्र लढवावी अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू, असं पवार म्हणाले. शिंदे यांचं बंड एका दिवसात झालं नाही. बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी जी तत्परता दाखवली. अशी तत्परता दाखवणारे हे पहिलेच राज्यपाल आहेत, असंही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.