Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात रोज राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि सेलची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. मात्र, हा निर्णयामागचं कारण अजूनही गुलदस्तात आहे.

राष्ट्रवादीचे सचिव प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी यासंदर्भात सर्व सेलच्या प्रमुखांना पत्र दिले आहे. कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. विविध निवडणुकांच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांची बदली होऊन नव्या नियुक्त्या होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून हा निर्णय राष्ट्रीय स्तरावरील असल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र किंवा अन्य कोणत्याही राज्यातील पक्ष संघटनेशी आपला संबंध नाही, असेही पटेल यांनी सांगितले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.