Take a fresh look at your lifestyle.

काश्मीरबाबत शरद पवारांचं मोठं विधान; फारूक अब्दुल्लांच्या परिवारावर उधळली स्तुतिसुमने

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी काश्मीरबद्दल मोठे विधान केले असून त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येण्याची दाट शक्यता आहे. मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ गौरव समितीतर्फे अमृत महोत्सव पार पडला यावेळी शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी काश्मीर बद्दल मोठे भाष्य करताना म्हटले की, काश्मीर भारतात राहण्यामागे फारूक अब्दुल्लांच्या वडिलांचे मोठे योगदान आहे. अब्दुल्ला परिवाराची निष्ठा ही कायम भारतासोबत आहे. अशाप्रकारे शरद पवार यांनी अब्दुल्लांच्या परिवारावर स्तुतिसुमनांची उधळणं केली, प्रसंगी कार्यक्रमाला फारूक अब्दुल्ला यांचीदेखील उपस्थिती होती.

राज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; विविध प्रशासकीय विभागात मोठे फेरबदल

पुढे बोलताना पवार म्हणाले की, देशाची राजधानी दिल्लीत सर्व राज्य सरकारांची निवासस्थाने आहे परंतु महाराष्ट्राच्या निवास्थानाबद्दल नेहमी विचारले जाते की ते कुणी बांधले आहे, तर याचे संपूर्ण श्रेय छगन भुजबळ यांना जाते. याशिवाय पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणून नामकरण करण्यात देखील छगन भुजबळच कारणीभूत आहे, असे पवार म्हणाले.

‘या’ स्कीममध्ये 238 रुपये गुंतवा अन् मिळवा 54 लाख; असा असेल गुंतवणुकीचा पर्याय

भारतात काश्मीर मुद्दा हा संवेदनशील समजला जातो, यावेळी पवारांनी संपूर्ण अब्दुल्ला परिवाराचा गौरवच केल्याने त्यांच्या या भाष्यावर नक्कीच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.