Take a fresh look at your lifestyle.

शिंदे-फडणवीस सरकार सहा महिन्यांत कोसळणार – सुषमा अंधारे

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील सत्ताधारी सुरळीतपणे कार्यभार सांभाळत असताना अधून मधून विरोधकांकडून सरकार कोसळणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात असतात, विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी कुठलाच मुद्दा नसताना असे सूर आवळण्याचे प्रकार यापूर्वी देखील झाले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे अधिवेशन झाले यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी देखील शिर्डी अधिवेशन संपल्यावर राज्यातील सरकार कोसळणार असल्याचा भक्कम दावा केला, जो सपशेल फोल ठरला आहे. आता विरोधी गटातून पुन्हा एकदा सरकार कोसळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, यावेळी नेमका हा सूर ठाकरे गटातून उमटला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील सरकार आगामी पाच ते सहा महिन्यात कोसळणार, असे विधान केले आहे.

महाराष्ट्रात महागाईचा दर इतर राज्यांपेक्षा अधिक; शहरी भागात महागाईची आकडेवारी चिंतादायक

भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंत नेत्यांना स्थान नाही इथे फक्त आयारामांना स्थान दिले जात असल्याने अनेक नेते पक्षात नाराज आहे असे सुषमा अंधारे म्हणाल्या प्रसंगी त्यांनी पंकजा मुंडे यांचे उदाहरण दिले. काही निष्ठावंतांना भाजपात जाणीवपूर्वक बाजूला केल्या गेले असल्याचा आरोप देखील अंधारे यांनी केला, त्या कोल्हापुरात महाप्रबोधन यात्रेकरिता आल्या असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सध्या पालकमंत्री हे आमदारांना विश्वासात घेत नाही यामुळे अंतर्गत नाराजी आणि धुसफूस सध्याच्या सरकारमध्ये दिसून येत आहे, आमदार सुहास कांदे हे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराज असल्याचे उदाहरण देखील यावेळी अंधारेंनी दिले.

ठाकरे गटाला न्यायालयाकडून धक्का; ‘या’ प्रकरणी निर्णय देताना फेटाळली याचिका

भाजपच्या मर्जीतील आमदार रवी राणा हे जाणीवपूर्वक आमदार बच्चू कडू यांची राजकीय आणि सामाजिक प्रतिमा मालिन करत आहे, त्यामुळे प्रथम कारवाई रवी राणांवरच केली जावी असे सुषमा अंधारे म्हणाल्या. एकंदरतीच विविध कारणांनी भाजप पक्ष तसेच शिंदे गटामध्ये मतभेत असल्याने येत्या पाच ते सहा महिन्यांत शिंदे – फडणवीस सरकार पडणार असा दावा पत्रकारांसोबत संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी केला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.