Take a fresh look at your lifestyle.

शिंदे सरकार शॉक देण्याच्या तयारीत; सणासुदीच्या तोंडावर वीज दरवाढ अटळ!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे सरकार झटका देण्याची तयारी करत आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार पुन्हा एकदा वीज दरवाढीने सर्वसामान्य ग्राहकांना धक्का देणार आहे. वीज नियामक आयोगाने विजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या दरात वाढ करण्यास मान्यता दिली असून आता दरवाढ अटळ आहे.

ऐन दिवाळीसमोर लाल परी देणार धक्का; प्रवाशांच्या खिशाला कात्री

राज्यातील जनतेला पुन्हा वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपनी महावितरणला वीज दरवाढ प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले. तर महावितरणने वीजदर वाढवल्याने कंपनीचे आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण देत आहे. मात्र या नावाने महावितरण आधीच ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्क आकारत आहे.

…आणि राष्ट्रवादीला एकत्र करून खंजीर चिन्ह द्यायला हवे होते – गोपीचंद पडळकर

कृषी क्षेत्रातून महावितरणला 45 हजार 700 कोटी रुपये येणे बाकी आहे. पथदिव्यांसाठी 6 हजार 500 कोटी, पाणीपुरवठ्यासाठी 1800 कोटी आणि घरगुती वीज वापरकर्त्यांकडून 1900 कोटी थकीत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील 750 कोटींची थकबाकी अजूनही आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने गेल्या काही दिवसांपासून दरवाढ करण्याची तयारी केली आहे.

‘या’ स्कीममध्ये 238 रुपये गुंतवा अन् मिळवा 54 लाख; असा असेल गुंतवणुकीचा पर्याय

राज्यात वीज दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने यापूर्वीच घेतला आहे. लवकरच दरवाढ होणे जवळपास निश्चित आहे. वीज खरेदी खर्चात वाढ करण्यासाठी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे.

त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 पासून वाढीव खरेदीसाठी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. सध्या हे शुल्क प्रति युनिट १.३० रुपये आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांनी वाढणार आहे. त्यामुळे इंधन शुल्काचा दर 2 रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.