Take a fresh look at your lifestyle.

शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरेंचा शिवसेनेवर घणाघात; पक्ष चिन्हाबद्दल व्यक्त केला आशावाद

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकतीच पैठण येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी उद्धव ठाकरे व शिवसेना पक्षावर चौफेर फटकेबाजी करत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, आमच्यासोबत ४० आमदार व १२ खासदारांचा पाठिंबा आहे, तर खरा पक्ष कुठला? असा जणू प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. असे असून सुद्धा आम्हाला गद्दार म्हणण्यात येते, परंतु आम्ही गद्दार नसून जे सध्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत ते गद्दार असल्याचे मत देखील मंत्री भुमरे यांनी व्यक्त केले.

पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावे; अमोल मिटकरींनी दिली खुली ऑफर

पुढे बोलताना संदीपान भुमरे म्हणाले की, ठाकरे गटातील अजून दोन आमदार फुटणार आहे व ते नक्कीच आम्हाला येऊन भेटणार. यामधील एक आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच यावर पुढल्या बाबी स्पष्ट होतील. पक्षचिन्हावर देखील भुमरे यांनी दिलखुलासपणे मत व्यक्त केले की, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, त्यामुळे लवकरच सगळ्यांच्या आशीर्वादाने धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळणार असा मला विश्वास आहे.

…पण काँग्रेसमध्ये जाणार नाही; नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

जर भुमरे यांचा दावा खरा ठरला तर ते दोन कोण आमदार आहे जे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहे, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. आगामी काळात निवडणुकीच्या तोंडावर अनेक फेरबदल होण्याची शक्यता असल्याने भुमरे यांचे विधान सूचनावजा इशारा होते असे ग्राह्य धरल्यास, गैर ठरणार नाही. एकंदरीतच शिवसेनेचे खिंडारसत्र येत्या काळात आणखी सुरूच राहणार की थांबणार हे लवकरच कळेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.