Take a fresh look at your lifestyle.

शिंदे गटाच्या रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात; १०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शिवसेना पक्षाचे विभाजन होताच शिंदे गट वेगळा झाल्याने उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा कलगीतुरा रंगला आहे. सध्या उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न करत असताना सत्ताधाऱ्यांच्या आरोपांच्या फैरीने हे नेते प्रचंड चर्चेत आले आहे. असेच एक विधान नुकतेच शिंदे गटाच्या रामदास कदम यांनी केले असून त्यांनी चक्क आदित्य ठाकरे यांच्यावर मोठया रकमेची हेराफेरी केल्याचा आरोप लावला आहे. सविस्तर वृत्त असे की, आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडी सरकार असताना पर्यावरण मंत्री पदावर कार्यरत होते त्या वेळी त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून १०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिंदे गटाच्या रामदास कदम यांनी लावला आहे.

जगभरात २०२३ मध्ये आर्थिक मंदी येणार; जागतिक बँकेचा सूचनावजा इशारा

पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, सदर प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील दिले आहे. शंभर खोके कुठून घ्यायचे हे आदित्य ठाकरे यांना बरोबर माहित आहे, त्यामुळे गद्दार व शंभर खोक्याची भाषा पिता पुत्रांनी करू नये असा घणाघात कदमांनी केला आहे. बाप मुख्यमंत्री बेटा मंत्री आणि मंत्री बाहेर असा कारभार होता, असे देखील रामदास कदम म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाबरोबर युती ही कुठल्याही आमदाराला पसंत नव्हती जर वेगळे झाले असते तर आज ही स्थिती झाली नसती असे देखील यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले.

पेट्रोलबाबत दिलासा मिळण्याचा अंदाज; तब्बल १२ रुपयांपर्यंत दरांमध्ये घसरण होण्याचे संकेत

एकंदरीतच शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी हा वाद चांगलाच जुंपला असून येत्या काळात आरोपावर प्रत्यारोप होणार व राजकीय वर्तुळात हे प्रकरण रंगणार असे चित्र बघायला मिळू शकते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.