Take a fresh look at your lifestyle.

तांदुळनेर सेवा संस्थेच्या चेअरमनपदी शिंगोटे यांची निवड

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : तालुक्यातील तांदुळनेर येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी बाबासाहेब सदाशिव शिंगोटे व व्हॉइस चेअरमनपदी तुकाराम कारभारी सरोदे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक होऊन वरील पदाधिकारी ह्यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी लेखापरीक्षक सहकारी संस्था एस पी धनवडे उपस्थित होते. तसेच लेखापरीक्षक सहकारी संस्था राहुरीचे देशमुख हे सदर प्रसंगी हजर होते .

सदर निवडी प्रसंगी संस्थेचे सर्व नवनिर्वाचित सदस्य सखाराम जबाजी कुमकर, काशिनाथ दादा नाईकवाडे, भिकाजी सीताराम सरोदे, शरद सयाराम आरोटे विठ्ठल मारुती, नामदेव श्रीरंग साबळे, मुक्ताजी भिकाजी खाटेकर, उमाजी गुजाबा संसारे, कचरू सीताराम नाईकवाडे, अनिता अशोक साबळे, शेवंताबाई रायजी गागरे हजर होते. तसेच पोलीस पाटील विश्वनाथ शिंगोटे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब सरोदे, माजी सरपंच रघुनाथ मुसमाडे, तांदुळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच साहेबराव शिंगोटे, संतोष साबळे, भाऊसाहेब बेलकर तसेच संस्थेचे सचिव मछिंद्र साबळे, पांडुरंग साबळे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.