Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : शिर्डी साई संस्थानचे ‘विश्वस्त मंडळ’ बरखास्त; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : जगभरातील श्रद्धाळू शिर्डी साई मंदिर येथे दर्शनाला येतात त्यामुळे हे संस्थान ‘हायप्रोफाइल’ म्हणून ओळखले जाते. संस्थानचा कारभार हा नेमलेल्या विश्वस्त मंडळाद्वारे चालतो ज्यामध्ये राज्यभरातून एकूण १६ सभासदांची मंडळावर नेमणूक करण्यात येते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या काही महिन्यांपूर्वी नवे विश्वस्त मंडळ शिर्डी संस्थांनकरिता नेमण्यात आले होते, त्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव शेळके यांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणाची याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती ज्यावर अनेक दिवस सुनावणी चालली. नुकताच याप्रकरणी निकाल देण्यात आला असून, शिर्डी संस्थांनचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा आदेश न्यायालयातर्फे देण्यात आला आहे.

‘या’ अभिनेत्रीच्या अडचणी कमी होईनात; पुन्हा बजावले समन्स

न्यायालयाने निकाल देताना काही प्रमुख बाबींचा उल्लेख केला ज्यामध्ये येत्या दोन महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ शिर्डी साई मंदिर संस्थानकरिता नेमण्यात यावे असा आदेशाचा देखील समावेश आहे. सध्या शिर्डी साई मंदिर संस्थानचा कारभार जिल्हा न्यायधीश बघणार आहे. जोपर्यंत नवीन विश्वस्त मंडळ नेमल्या जात नाही तोवर जिल्हा न्यायाधीशाच्या देखरेखीखाली साई संस्थानचा कारभार चालणार आहे.

‘जेडीयू’ला भाजपचा दणका; नेत्यांची पाऊले चालती ‘भाजपची’ वाट

महाविकास आघाडी सरकारने केलेली नेमणूक ही साई मंदिर संस्थानच्या घटनेनुसार नसल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला त्यामुळे सर्व बाबींचा सखोल विचार करत औरंगाबाद खंडपीठाने अंतिम निर्णय याप्रकरणी दिला आहे. न्यायालयाचा हा निर्णय महाविकास आघाडी करिता नक्कीच मोठा धक्का असून, यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात ते बघणे महत्वाचे ठरणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.