Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेचे ‘गळतीसत्र’ सुरुच; पक्षाच्या पहिल्या नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई: राज्यातील नवीन सरकार स्थापनेनंतर एकीकडे शिंदे सरकार लवकरच मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet Expansion) करणार आहे तर येत्या काही महिन्यांत राज्यातील महापालिका निवडणुकीचे(Municipal Corporation Election) बिगुल वाजणार आहे. या सर्व राजकीय उलाढाली बघता आमदारानंतर आता स्थानिक नगरसेवक देखील शिंदे गटात एकामागून एक सामील होत आहे. ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांनी या अगोदरच शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. आता चक्क शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका(Ward Member) शीतल म्हात्रे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या आहे.

सत्ताधारी चुकीचे असतील, तिथे आवाज उठवणार- अजित पवार

शीतल म्हात्रे या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहे तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यादेखील आहे. दहिसर पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ (Constituency) आहे. येथे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड (Revolt) केले होते त्यावेळी शीतल म्हात्रे यांनी सर्व बंडखोरांना कठोर शब्दांत इशारा दिला होता. परंतु आता खुद्द त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याने नक्कीच हा शिवसेनेकरिता मोठा आघात मानण्यात येत आहे. भविष्यात हे गळतीसत्र असेच सुरु राहील अशी चिन्हे सध्यातरी दिसत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.