Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरेंना मोठा झटका! शिवाजीराव आढळराव पाटलांनी सोडली सेनेची साथ

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे – मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सेनेविरुद्धच्या बंडानंतर अनेक आमदारांनी त्यांना साथ दिली. अनेक पदाधिकारी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होतांना दिसत आहेत. अशातच, शिवसेनेचे तसेच उद्धव ठाकरे यांचे कट्टर निष्ठावंत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही २० दिवसांच्या संयमानंतर अखेर शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतलाय.

शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात; लोकसभा सभापतीला देणार पत्र

आज शिंदे गटाने बोलाविलेल्या बैठकीला आढळरावांनी ऑनलाईन उपस्थिती लावत उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावचे रहिवासी असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षातूनच आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. विशेष म्हणजे भीमाशंकर साखर कारखाना उभारणीत देखील आढळराव पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादीतून झाली असली तरी आढळरावांना पवारांनी खासदारकीचं तिकीट नाकारल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि थाटात तीन वेळा शिवसेनेचा भगवा फडकवला. आज मात्र उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.

2004 साली आढळराव पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवाण्याची इच्छा होती. मात्र; त्यावेळी शरद पवारांनी त्यांना तिकीट देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2004 साली शिवसेनेकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून पहिल्यांदा संसदेत पाय ठेवला. शिवसेनेचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते पहिले खासदार झाले.

एकनाथ शिंदेंकडून सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर, उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद डावललं?

आजवर शिवसेनेतर्फे आढळराव पाटील सलग तीन वेळा संसदेवर गेले. शिरुर लोकसभेचं १५ वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं. तसेच बैलगाडा शर्यती सुरू करण्यात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे. आज त्यांनी शिंदे गटात सहभाग नोंदवल्याने हा शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.