Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! पावसाच्या दृष्टचक्राने केला पुन्हा घात; ‘या’ जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : अस्मानी संकट त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा स्थितीमुळे यंदा शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. डोळ्यापुढे शेतातील उभे पीक पाण्याखाली बघत असताना काहीही न करू करू शकणाऱ्या ५ शेतकऱ्यांनी आपली जीवयात्रा संपवत टोकाचा निर्णय घेतला आहे. ही घटना आहे बीड जिल्ह्यातील. यंदा हंगामी पावसाने अपेक्षेपेक्षा अधिक हजेरी लावली त्यामुळे अनेक पिकांची नासाडी झाली होती. यातून सावरत कसेबसे पीक हाती आले असताना पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उपजिविकेवर घाला घातला आहे. यामुळे हाती काहीच लागणार नाही या नैराश्येपोटी या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. ही स्थिती कमालीची भयावह असून राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील स्थिती जुळतीमिळती आहे.

भारतीय महिलेचा ड्रग्ज तस्करीसाठी वापर; दिल्लीत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

यंदा शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे पावसाने पिकांची नासाडी झाली असताना दरम्यानच्या काळात आलेल्या लंपी आजाराने अनेक शेतकऱ्यांचे पशुधन मृत्युमुखी पडले आहे, यामुळे जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायावर देखील संकट कोसळले आहे. यंदा तरुण शेतकऱ्यांनी अधिक आत्महत्या केल्याचा अहवाल आहे, नुकत्याच आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील राजेगाव येथील शेतकऱ्याचे वय अवघे २३ वर्ष इतके होते. कर्जाचा डोंगर बघता शेतकरी शेवटी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेत आहे. मागील वर्षी २१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या तर यंदा नऊ महिन्याच्या कालावधीत ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

मोठी बातमी : मल्लिकार्जुन खरगे झाले काँग्रेसचे नवे अध्यक्ष; शशी थरूर यांचा पराभव

सततच्या पावसाने शेतकऱ्यांना बेजार करून सोडले आहे, अनेक जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी इत्यादी महत्वाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना चरितार्थ चालवायचा कसा हा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. ऐन पिकविक्रीच्या हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन व कपाशी नासवली आहे. सोयाबीनला कोंब फुटले असून कपाशीची बोंडे अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे. सरकारने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असताना आर्थिक विवंचनेतून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. नुकसान परिस्थिती भीषण असून सरकारने या प्रकरणी संवेदनशीलता दाखवत तातडीने शेतकऱ्यांना मदत वर्ग करणे अपेक्षित आहे, कारण कुठलेही सरकार असले तरी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधनच शेतातील पीक असल्याने नेमके तेच नष्ट होत असल्याने त्यांच्या संयमाचा बांध तुटत आहे व शेवटी ते असे टोकाचे निर्णय घेत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.