Take a fresh look at your lifestyle.

श्रीरामपुरात श्री रामनवमी उत्साहात

0
maher

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : दोन वर्षांच्या खंडानंतर श्री रामनवमी यात्रा मोठ्या प्रमाणात भरली. आठ दिवसाच्या पूजाअर्चाने मंदिर दुमदुमले होते. रामनवमीच्या दिवशी श्रीराम जन्म सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. श्री रामाच्या जय जयघोष करून मंदिर दुमदुमला होते.

शहरातील श्री राम मंदिर व काळा राम मंदिरात मान्यवरांच्या हस्ते श्रीरामाच्या पाळण्याची दोरी ओढून राम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर रामनवमी यात्रेला प्रारंभ झाला. दिवसभर महसूल प्रशासनासह विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीने येवून मंदिरावर झेंडे चढविले.
रामनवमीनिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. दुपारी मंदिरात रामजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी सभापती वंदना मुरकुटे, अशाेक कानडे, युवक नेते सिध्दाथर् मुरकुटे, प्रांताधिकारी अनिल पवार व सई पवार, तहसीलदार प्रशांत पाटील व वैशाली पाटील, पाेलिस उपअधिक्षक संदिप मिटके, अचर्ना पानसरे, रंजना पाटील, संजय फंड, सचिन गुजर, दिलीप नागरे, श्रीराम मंदिर ट्रस्टच्या प्रणिता गिरमे, सचिव दिनेश सूयर्वंशी, राेनक गिरमे, रमेश झिरंगे, अनिल गिरमे, वैशाली गिरमे, अशाेक फाेपळे, अमोल महाले, प्रतिक बाेरावके, यात्रा कमिटीचे अध्यक्ष राम टेकावडे, कार्यकारी अध्यक्ष सत्यनारायण उपाध्ये, सचिव सुरेश ओझा, सहसचिव बाबासाहेब लबडे, विश्‍वस्त रमजान शेख, आशिष बोरावके, इकलाख शेख, मोहनभाई पटेल, गौतम उपाध्ये, अशोक उपाध्ये, ज्ञानेश्वर मुरकुटे आदी उपस्थित होते.

सजविलेल्या रामाच्या पाळण्याची दोरी ओढल्यानंतर जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी भाविकांना पंजेरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. सकाळी अभिषेक, आरती तसेच कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी सजविलेल्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. प्रवरा कालव्यानजिक शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली.दिवसभर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महसूल, शहर पोलीस ठाणे, गोंधवणी येथील महादेव मंदिर, तालुका पोलीस ठाणे, डावखर मित्रमंडळ, श्रीराम मंडळ आदीसह १३ मंडळांनी झेंड्याची सवाद्य मिरवणूक काढून मंदिरावर झेंडे चढविले. शहरात यात्रेनिमित्त मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी दुकाने थाटली. थत्ते मैदान परिसरात रहाट पाळणे लावण्यात आली होती. यात्रेमुळे शहर गजबजून गेले होते. मंगळवार (ता. १३) दुपारी ३.३० वाजता तहसील कचेरीजवळ कुस्त्याचा हगामा आयोजित करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.