Take a fresh look at your lifestyle.

बंधाऱ्यात बुडून मुलाचा मृत्यू बेलापूर परिसरातील घटना

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर – तालुक्यातील बेलापूर ऐनतपूर शिवारात एक भयंकर घटना घडली आहे. येथील अशोक बंधाऱ्यात बुडून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विशेष महेंद्र शिवदे (वय १४) असं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

रंगपंचमी असल्याने रंग आणि पाणी खेळण्यासाठी काही मुले या बंधारा परिसरात दुपारी 12 वाजेच्या दरम्यान गेली होती. बंधाऱ्यात फारसा पाणी साठा नव्हता. मात्र विशेष याला पोहता येत नव्हते. त्यामुळे पाण्यात पोहण्यासाठी उतरताच त्याचा तोल गेला.

सोबतच्या मित्रांना विशेष याला वाचवता आले नाही. त्यांनी घरी येऊन कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, गावातील नागरिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत विशेष याला पाण्यातून बाहेर काढले.

त्यानंतर त्याला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच विशेष याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.