Take a fresh look at your lifestyle.

श्रीरामपूर मतदारसंघाला १ कोटी १० लाख रुपयांचा निधी : आमदार कानडे

0
maher

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांसाठी नव्याने सुमारे १ कोटी १० लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२१ -२२ या वर्षासाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उंदिरंगाव येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे, टाकळीभान येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे, पढेगाव येथे बोबडे वस्ती येथे काँक्रीटीकरण करणे, शिरसगाव येथे कनोसा वस्तीगृहासमोर पेव्हींग ब्लॉक बसवणे, मौजे शिरसगाव येथील इंदिरानगर मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे, दत्तनगर येथील रेणुकानगर मधील मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे, वांगी बु येथील कांबळे वस्ती (गणेशखिंड) मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे, कमालपूर येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे, कारेगाव येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे, उक्कलगाव पटेलवाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे, बेलापुर बु येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवणे, कडीत खु येथे प्रजिमा 21 ते सुभाष बनसोडे वस्तीपर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे व राहुरी तालुक्यातील 32 गावांतर्गत टाकळीमियाँ येथे सगळेवस्ती ते रेल्वे स्टेशन रस्ता पेव्हींग ब्लॉक बसवणे, टाकळीमियाँ येथे सगळेवस्ती ते लाख पीर बाबा रस्ता पेव्हींग ब्लॉक बसवणे या गावातील अंतर्गत रस्ते व विविध विकास कामांसाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले. यापूर्वी देखील सदर योजनेतून मतदारसंघाला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.

सदरची कामे सध्या प्रगती पथावर आहे आणि आता पुन्हा नव्याने १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे सदरच्या योजनेतून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला गेल्या वर्षभरात ३ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून गेल्या वर्षभरात मतदारसंघातील बहुतांशी गावे, आणि शहरहद्दीतील अनेक विकास कामांना निधी प्राप्त झाला आहे यातील बरेचसे कामे पूर्णत्वास गेले असून काही कामे प्रगतीपथावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.