Take a fresh look at your lifestyle.

आता घरबसल्या मिळवा 50 हजार रुपये महिना व्याज, आजच सुरू करा गुंतवणूक

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – कोरोना नंतरच्या काळात गुंतवणुकीचं तसेच बचतीचं महत्व सर्वानाच समजलं. खरं तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावावर गुंतवणूक करायलाच हवीच. सध्याचा महागाईचा वाढत आलेख झपाट्याने अजून वाढतच चालला आहे. निवृत्तीनंतर तुम्हाला किमान दरमहा 50 हजार रुपयांची गरज असेल, तर लवकरच तुमच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर गुंतवणूक करण्यास सुरुवात करायलाच हवी. बचतीच्या अनेक योजना देखील आहेत. बँकांसहित पोस्टाकडून देखील अनेक योजना जाहीर केल्या जातात.

तुमच्या आधार कार्डचा मोबाईल सिमसाठी गैरवापर होतोय का? आधारशी लिंक सर्व फोन नंबर घरबसल्या तपासा

सध्या बँकांचा सरासरी वार्षिक व्याजदर 5 टक्के इतका आहे. सध्या तरी तो कमी होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत दरमहा 50 हजार रुपयांच्या व्याजासाठी तुमच्याकडे 1.2 कोटींचा निधी असायला हवा. त्यासाठी एसआयपी(SIP) हा गुंतवणुकीचा सर्वात उत्तम पर्याय आहे.

12 टक्के सरासरी परतावा
उदाहरणार्थ, आता तुम्ही 30 वर्षांचे आहात. यावेळी तुमच्या नावाने 3500 रुपये दरमहा SIP करणे सुरू करा. SIP च्या सध्याच्या फेरीत, तुम्हाला किमान 12% वार्षिक परतावा मिळणे अपेक्षित आहे.

Alert! महाराष्ट्रातील ‘या’ भागात गारपिटीची शक्यता; तर या जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम

1.25 कोटी रुपयांचा निधी
30 वर्षे दरमहा 3500 रुपये जमा करून, तुम्ही 12.60 लाख रुपये गुंतवता. यावर, जर तुम्हाला वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा मिळत असेल, तर 30 वर्षे पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे 1.23 कोटींचा निधी तयार असेल.

दरमहा 50 हजार व्याज
जर तुम्ही 1.23 कोटी रुपयांच्या निधीवर वार्षिक 5 टक्के दराने व्याजाचे गणित केले तर ते वार्षिक 6.15 लाख रुपये येते. अशा प्रकारे, तुम्हाला दरमहा 50 हजार रुपयांचे उत्पन्न सहज मिळेल.

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार!

म्युच्युअल फंड आणि त्यांचे उत्पन्न
एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाने गेल्या काही वर्षांत 20.04 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. दुसरीकडे, निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने 18.14 टक्के आणि इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड योजनेने 16.54 टक्के दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.