Take a fresh look at your lifestyle.

अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल बंपर कमाई

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – जर तुम्ही कमी गुंतवणूक आणि साधनांचा वापर करून एखादा व्यवसाय (Business) सुरू करण्याचा विचार करत असाल तर एक लहान ऑईल मिल उभारणं हा तुमच्यासाठी सर्वात योग्य पर्याय ठरू शकतो. खाद्य तेलाला (Edible Oil) नेहमीच मागणी असते आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्रीही होते. गाव असो किंवा शहर हा व्यवसाय कुठेही यशस्वी होण्याची हमी असते. पूर्वी मोहरीचं तेल (Mustard Oil) काढण्यासाठी मोठ्या मशीनचा वापर होत असे. पण, आता पोर्टेबल मशिन्स आली आहेत. या मशीनची किंमतही कमी आहे आणि ती बसवायला जास्त जागाही लागत नाही. अगदी कमी श्रमात या पोर्टेबल मशीन चालवता येतं.

आता बँक खात्यात पैसे नसतील तरी काढता येतील 10,000 रुपये; जाणून घ्या सरकारची नवीन योजना

असा सुरू करा बिझनेस –

खाद्य तेलाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला तेल काढण्याचं यंत्र, ते लावण्यासाठी एक मोठी खोली आणि ज्या बियांपासून तेल काढायचं आहे ते पीक कच्चा माल म्हणून आवश्यक आहे. आजकाल बाजारात अशी यंत्रं आहेत जी मोहरी, भुईमूग आणि तीळ इत्यादी तेलबियांपासून (Oilseeds) तेल काढण्यास सक्षम आहेत. घरगुती स्वरुपात हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मध्यम आकाराचं ऑईल एक्सपेलर मशीन (Oil Expeller Machine) योग्य ठरेल.

ऑईल एक्सपेलर मशीन दोन लाख रुपयांना मिळतं. याशिवाय, तुम्हाला ऑईल मील सुरू करण्यासाठी काही कागदपत्रांची देखील पूर्तता करावी लागेल. मीलच्या संपूर्ण उभारणीसाठी सुमारे तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट (Product) विकण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही चांगल्या दर्जाचं प्रॉडक्ट दिलं तर तुमच्या व्यवसायाला नक्कीच गती मिळेल.

LPG Cylinder : आता वाढत्या महागाईत देखील गॅस सिलेंडर मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी!

किती उत्पन्न मिळेल –

तुमचं ऑईल प्रॉडक्ट बाजारात आणण्यासाठी तुम्ही ऑनलाइन मार्केटिंगचीही (Online Marketing) मदत घेऊ शकता. किरकोळ विक्रीसाठी बाजारात तुमचं स्वतःचं काउंटरदेखील सेट करू शकता. तेलाबरोबरच मोहरीच्या पेंडीला (Oil Cake) देखील गिऱ्हाईक असते. पशुपालन करणारे लोक मोहरीची पेंड खरेदी करतात. यातूनही तुमची चांगली कमाई होऊ शकते. तुम्ही ऑईल मील उभारण्यासाठी केलेला खर्च एका वर्षात वसूल करू शकता. त्यानंतर दरवर्षी तुम्हाला यातून ठराविक उत्पन्न मिळू शकेल.

पोर्टेबल मशीनच्या सहाय्यानं तेलबियांपासून तेल काढण्याची प्रक्रिया सोपी आहे. त्यामुळे महिलादेखील हा व्यवसाय सहज करू शकतात. नोकरी शोधत बसण्यापेक्षा तरुण-तरुणींनी व्यवसाय करण्याचं ठरवलं तर कष्ट करून ते नोकरीपेक्षा कितीतरी पट अधिक पैसे कमवू शकतात.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नवीन ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी ९०% अनुदान योजना सुरु; असा करा अर्ज

Leave A Reply

Your email address will not be published.