Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर! आता केवळ 600 रुपये महिन्याची बचत करून बनू शकता करोडपती; अशी करा सुरुवात

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – अनेकांना कोट्यधीश बनण्याची इच्छा असते. याचं अनेकजण स्वप्नही पाहत असतील. पण तुमची ही इच्छा खरंच पूर्ण होऊ शकते. अतिशय कमी गुंतवणुकीत (Invest) तुम्ही मोठी रक्कम मिळवू शकता. कोट्यधीश होण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही, तर छोटी रक्कम (Start Investment) पण ती सातत्याने जमा करणं आवश्यक आहे.

IPL 2022 Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यासंदर्भात BCCI चा मोठा निर्णय

छोटी रक्कम दररोज, महिन्याला गुंतवून मोठा फंड तयार करता येतो. यासाठी पेशन्स ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. छोट्या रकमेची पण लाँग टर्म गुंतवणूक नक्कीच फायद्याची ठरू शकते. या लहानशा, महिन्याला खंड पडू न देता केली जाणारी गुंतवणूक तुम्हाला सत्यात कोट्यधीश बनवू शकते.

तुम्ही SIP अर्थात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये दर महिन्याला 500 रुपये जमा करुन चांगले रिटर्न्स मिळवू शकता. ही गुंतवणूक जितकी लवकर होते, तितकेच रिटर्न चांगले मिळतात. काही फंड्समध्ये 20 टक्क्यांपर्यंतचाही रिटर्न मिळतो.

महागाईचा आणखी एक जबर फटका, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ

तुम्ही दररोज 20 रुपये जमा करुनही मोठा फंड 1 कोटी रुपये बनवू शकता. जर एखादा 20 वर्षीय तरुण दररोज 20 रुपये गुंतवणूक करत असेल, तर महिन्याला ही रक्कम 600 रुपये होते. ही रक्कम दर महिन्याला SIP मध्ये लावता येऊ शकते.

20 रुपये सलग 40 वर्ष म्हणजेच 480 महिने जमा केले तर ही रक्कम जवळपास 10 कोटी रुपये होते. ही गुंतवणूक अधिक कालावधीसाठी असली तरी पेशन्स आणि एखाद्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने चांगल्या SIP मध्ये गुंतवणूक केल्यास हे टार्गेट नक्कीच पूर्ण करता येते.

🔥“तुमची लायकीच नाही की मी तुम्हाला उत्तर देऊ ; माझा तरी एक खासदार आहे…”

पण जर तुमचं वय 20 वर्षांहून अधिक असेल, तर त्यानुसार तुमची महिन्याची गुंतवणूक अर्थात रक्कम वाढवावी लागेल. तसंच कालावधीही वाढवू शकता.

PAN-Aadhaar लिंक होत नाहीय? जाणून घ्या कारणं; असं करा ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी लिंक

Comments are closed.