Take a fresh look at your lifestyle.

…तर ग्राहकांना दोन लाखांपर्यंत होणार फायदा; लाभ घेण्यासाठी करा ‘हे’ काम

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : तुमचे कोणत्याही बँकेत खाते असल्यास, तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळवू शकता. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे मात्र खरे आहे. अनेकांना याची खरी जाणीव नसते. हा फायदा कोणाला आणि कसा मिळेल, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देऊ.

तुमचेही बँक खाते असल्यास, तुम्ही दोन लाख रुपयांचा लाभ मोफत घेऊ शकता. जनधन ग्राहकांना बँकेकडून ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना दोन लाखांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण देते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. याशिवाय ग्राहकांसाठी आर्थिक सेवा, बँकिंग बचत, क्रेडिट, विमा, पेन्शन अशा अनेक सुविधा आहेत.

मोरबीची पूल दुर्घटनाही ‘अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड’ मानावे का? शिवसेनेचा मोदींना थेट सवाल

जनधन खात्याचे फायदे

  • सहा महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा
  • दोन लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा कव्हर
  • ३० हजार रुपयांपर्यंत लाइफ इन्शुरन्स कव्हर, लाभार्थीच्या मृत्यूनंतर अटी आणि शर्थी पूर्ण करणाऱ्याला ते पैसे मिळतात.
  • डिपॉझिटवर व्याज मिळतात
  • खात्यासह मोफत मोबाइल बँकिंगची सुविधाही दिली जाते.
  • जनधन खाते उघडणाऱ्या व्यक्तीला रुपे डेबिट कार्ड दिले जाते, जेणेकरून त्याला खात्यातून पैसे काढता येतील किंवा खरेदी करता येईल.
  • जनधन खात्याद्वारे विमा, पेन्शन उत्पादने खरेदी करणे सोपे आहे.
  • जनधन खाते असेल तर पीएम किसान आणि श्रम योगी मानधनसारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडले जाईल.
  • देशभरात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा
  • सरकारी योजनांच्या लाभाचे पैसे थेट खात्यात येतात.

गुजरात निवडणूक : भाजपची नवी खेळी; तीन देशातील अल्पसंख्याकांना राज्याचे नागरिकत्व मिळणार

असं सुरू करता येईल खातं

तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन ते अगदी सहज उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित व्यक्ती, व्यवसाय/रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि आश्रितांची संख्या, SSA कोड किंवा प्रभाग क्रमांक, पिन कोड इत्यादींची माहिती द्यावी लागेल.

ट्रान्सफर करण्याचाही पर्याय

तुमच्याकडे मूलभूत बचत खाते जन धन योजनेत हस्तांतरित करण्याचा पर्यायदेखील आहे. जन धन योजनेत खाते असलेल्यांना Rupay कार्ड मिळते. 2018 पर्यंत या खात्यावर विम्याची रक्कम एक लाख रुपये होती. आता ती वाढून दोन लाख रुपये झाली आहे. या खात्यावर ग्राहकाला अपघात विम्याचा लाभ मिळणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.