Take a fresh look at your lifestyle.

अत्यंत खळबळजनक! खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, तर मला फाशी द्या!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

न्यूज लाईन नेटवर्क

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर सीबीआय, ईडी, प्राप्तिकर या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा करतात मग कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधी ट्विटरवर कसे समजते, असा सवालही त्यांनी केला.

“आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या. इथं नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य खूप कलाटण्या देतं. आम्हीदेखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल; पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? पारदर्शक काम करा आणि न्याय करा,” असे सुळे यांनी सरकारला सुनावले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

पुरावे सादर करण्याची तयारी

याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते, असे सुळे यांनी नमूद केलं. त्या लोकसभेत केंद्रीय तपास संस्थांच्या कारभारासह महागाईवर बोलत होत्या. एखादा नेता १५ दिवसांत तुरुंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे कसं माहिती होतं, असे सवाल त्यांनी केले.

हेही वाचा – कांदा उत्पादक शेतकरी संकटात! विक्रमी लागवड होऊनही उत्पन्नात होणार मोठी घट

अमित शाह खरं बोलतात!

“हे सर्व ट्विटरवर येतं. मी याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते. याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. खरं बोला, अमित शाह खरं बोलतात. मला वाटतं मी फक्त त्यांनाच याबाबत विचारायला हवं. सरकारमध्ये इतर कोण खरं बोलतं याबाबत माहिती नाही. शाह तर नक्की खरं बोलतात,” असं म्हणत सुळे यांनी भाजपला टोला लगावला.

हेही वाचा – सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, तर चांदीच्या दरात घसरण, पटापट तपासा आजचे दर

मी मागते मोदी सरकारकडे न्याय!

सुळे म्हणाल्या, की दुसरी गोष्ट म्हणजे ही माहिती लिक होत आहे का? जर एक पेपर लिक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकाऱ्याला तुरुंगात टाकले जाते. आता जेव्हा तुमचे दोन कार्यकर्ते छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती देत आहेत. मी हे सिद्ध करू शकते. तुम्हाला कोणीही विचारणारे नाही का? मी मोदी सरकारकडे न्याय मागत आहे.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.