Take a fresh look at your lifestyle.

आमदार लंके सामाजिक प्रश्नांची जाण असलेले लोकप्रतिनिधी : हजारे

0

संजय वाघमारे, ओटीटी न्यूज नेटवर्क

पारनेर : आमदार नीलेश लंके सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची, व्यथांची जाणीव आहे. सर्वसामान्यांना सुखाने जगता यावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. राज्याच्या राजकारणात सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी झटणारा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार लंके यांचा नावलौकिक असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.

राळेगण सिद्धी येथील ३३ लाख ५० हजार रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार लंके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, लाभेष औटी, सरपंच धनंजय पोटे, अमोल मापारी, सागर पठारे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ समाजसेवक हजारे म्हणाले की, संत यादव बाबा शिक्षण प्रसारक मंडळाने श्रमदान व लोकसहभागातून संत निळोबाराय विद्यालयाच्या अद्ययावत इमारतीची उभारणी केली. विद्यालयाच्या प्रांगणात पेव्हींग ब्लॉक बसवण्यासाठी आमदार लंके यांनी २३ लाख ५० हजार रुपये तर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्यासाठी माजी सरपंच मापारी आणि दत्ता आवारी यांनी पाठपुरावा केल्याचे ज्येष्ठ समाजसेवक हजारे म्हणाले. राळेगण सिद्धीसह ६ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार लंके प्रयत्नशील आहेत. राळेगण सिद्धी येथील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे राळेगण सिद्धी परिवाराच्यावतीने हजारे यांच्या हस्ते आमदार लंके यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.