Take a fresh look at your lifestyle.

सोनेरी पहाट आणि माहेर कट्टातर्फे ७१ महिलांचा ‘नारी सक्षम पुरस्कारा’ने गौरव

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील सक्करदरा येथे २६ मार्च रोजी संताजी सांस्कृतिक सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारी सक्षम अवार्ड आणि नुत्यस्पर्धा’ कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम सोनेरी पहाट बहुउद्देशीय संस्था आणि माहेर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या नृत्यस्पर्धात विविध क्षेत्रातील ५ ते १८ वयोगटातील तब्बल ५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. त्याचबरोबर, या स्पर्धेत क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या उपमहापौर मनीषा धावडे, सोनेरी पहाट संस्थेच्या अध्यक्षा रेखाताई भोंगाडे, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र विदर्भ संघटन कल्पना उपाध्याय, सविता बेदरकर, मिस युनिव्हर्स प्रविना दाढे, दिग्दर्शक संजीवनी चौधरी, शिल्पा शाहीर, सुनिता कांबळे, वंदना व्यास, शालिनी तभाने, हर्षा नायगावकर तसेच ऑन धिस टाइम डिजिटल मीडियाचे संपादक श्रीधर ढगे, मोनाली पिसे (एचआर), रूपल दोडके (माहेर कट्टा समन्वयक) उपस्थित होत्या.

*’या’ स्पर्धकांना मिळाले पुरस्कार*

५ ते १५ वयोगटामधील निधी रेहपाडे (प्रथम क्रमांक), माधुरी पडोळे (द्वितीय क्रमांक), आर्या सिंग (तृतीय क्रमांक) यांना पुरस्कार तसेच राशी पारधी हिला प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर, १६ वयोगटांमध्ये राधिका फुलारी (प्रथम क्रमांक), गोंदियातील श्रुती केकत (द्वितीय क्रमांक), खुशी महाकाळकर (तृतीय क्रमांक), आणि नेहा मिश्रा हिला प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला. सोबतच, सामूहिक नृत्यामध्ये कथक ग्रुप आणि १८ पेक्षा अधिक वयोगटांमध्ये हिरकणी ग्रुप यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दरम्यान, शौर्य ग्रुप आणि आर्यन ग्रुप यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सावनेरमधील विशेष आकर्षण लोकरंग कला शृंगार गृह या ग्रुपने अतिशय आकर्षण कामगिरी सादर केली.

*कर्तृत्ववान महिलांना मिळाला सन्मान*

तुलसी भोंगाडे, अमन भोंगाडे, मनीष पडोळे, अंकिता सुरकार, लोकेश येरने, नीलम चव्हाण, सोनल महाकाळकर, लता बोरकर, कविता बोबडे, कीर्ती कवीश्वर, सारिका खडसे, नितीन त्रिपाठी आणि माहेर कट्टाचे समन्वयक यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Leave A Reply

Your email address will not be published.