Take a fresh look at your lifestyle.

“राज्य अर्थ विभागाने ‘स्टार्टअप’ उभारणीसाठी सहाय्य करावे”- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनानंतर बदललेल्या आर्थिक स्थितीमुळे अर्थार्जनाचे पर्याय देखील बदलले असून, अनेक तरुण-तरुणी रोजगार शोधण्याऐवजी स्वयंरोजगारावर अधिक भर देताना दिसत आहे. जुन्या चाकोरीतून बाहेर पडत अनेकजणांनी स्वतंत्र वाटा शोधत अत्यल्प भांडवलात स्टार्टअप तत्वावर व्यवसाय सुरु केले आहे, यामध्ये बहुतांश युवावर्ग यशस्वी देखील होताना दिसून येत आहे.

भारतीय अर्थव्यवस्था अस्थिरतेतही सावरेल; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०२२ तसेच महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा विजेता सन्मान सोहळा नुकताच पार पडला, हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून नुकताच राजभवनात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी महत्वपूर्ण विधान करताना राज्यपाल महोदयांनी म्हणाले, राज्यातील स्टार्टअप उभारणी करण्याकरिता राज्याच्या अर्थ विभागाने सहाय्य करावे.

‘दैनिक अजिंक्य भारत’चे हेलिकॉप्टरमधून वितरण; मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, प्रसंगी लोटली वाचकांची गर्दी

पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून देशात नाविन्यतेचा विशेषपणे पुरस्कार करण्यात येत असून यामुळे येत्या काळात त्याला चालना देण्याची गरज आहे. नवीन स्टार्टअप उभारणीसाठी राज्य सरकारची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे, त्यामुळे राज्य अर्थ विभागाला राज्यपालांनी याप्रसंगी आर्थिक सहाय्य करण्याच्या सूचना दिल्या.

“निकोप समाजासाठी सक्षम न्यायव्यवस्थेची गरज”-पंतप्रधान नरेंद्र मोदी

संपूर्ण देशात ८०,००० स्टार्टअप असून त्यापैकी ५०,००० एकट्या महाराष्ट्रात आहे. यामुळे स्टार्टअप च्या बाबतीत महाराष्ट्र देशाची राजधानी आहे. अर्थमंत्री म्हणून स्टार्टअपला आर्थिक सहाय्य आपण देऊ अशी हमी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण विभागातून तसेच शहरांमधून स्टार्टअप उद्योग पुढे येत आहे, याचे कारण म्हणजे वर्ष २०१८ पासून स्टार्टअप धोरण राबविणारे महाराष्ट्र अग्रणी राज्य ठरले आहे. सदर कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्टार्टअपला सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना भविष्यात विविध कार्यक्षेत्रात कार्यास पाठबळ म्हणून प्रोत्सहानपर १५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.