Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजाराला मोठा फटका; मार्केट उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी आपटला

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : यूएस फेडने व्याजदरात वाढ केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतातील शेअर बाजारांना मोठा फटका बसला आहे. मोठ्या आकड्यांसह उघडल्यानंतर शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरला. त्यामुळे ही मोठी निराशा आहे.

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला, निफ्टी 17,200 च्या खाली उघडला, रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर गेला आणि त्याचे परिणाम शेअर बाजारांवर दिसू लागले. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरातही घसरण होत आहे.

शिवसेना संपेल या भ्रमात कुणीही राहू नये ; सामनातून भाजप व शिंदे गटावर ‘टीकास्त्र’

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजार 750 अंकांनी घसरला. निफ्टीही 250 अंकांनी घसरला.

त्यामुळे शेअर बाजारात मंदी येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. केवळ बाजारच घसरला नाही, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही लक्षणीय घसरण झाली आणि रुपया 81.54 पर्यंत घसरला. रुपया 56 पैशांनी घसरला आहे. रुपया दररोज विक्रम मोडत असून डॉलरचे मूल्य वाढत आहे. त्यामुळे अनेक गोष्टी महागण्याची शक्यता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.