Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात त्सुनामी; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : जागतिक बाजारातील मोठ्या घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात (stock market) खळबळ उडाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. BSE सेन्सेक्स (BSE Sensex) 1 हजार 466 अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टी (Nifty) उघडताच 370 अंकांनी घसरला. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स 1 हजार 300 अंकांनी म्हणजेच 2.23 टक्क्यांनी घसरून 57 हजार 518 वर होता, तर निफ्टी 385 अंकांनी म्हणजेच 2.22 टक्क्यांनी घसरून 17 हजार 179 वर होता. (Big fall in Sensex-Nifty)

सुरुवातीच्या व्यापारात, नेस्ले आणि हिंदुस्थान युनिलिव्हर (Nestle and Hindustan Unilever) वगळता सेन्सेक्समधील 30 समभाग लाल रंगात व्यवहार करत होते. सकाळी 9.30 वाजेपर्यंत सेन्सेक्स टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस सर्वाधिक घसरले.

आशिया कपमध्ये इंडियाचा रोमांचक विजय; पाकिस्तानच्या पराभवानंतर शरद पवारांचा जल्लोष

सर्वात मोठी घसरण आयटी शेअर्समध्ये (IT shares) दिसून आली. निफ्टी आयटी (Nifty IT) 3.85 टक्क्यांपर्यंत घसरला. याशिवाय इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकही लाल चिन्हात आहेत. निफ्टी बँक 1.95 टक्के, निफ्टी मेटल्स 2.24 टक्के, पीएसयू बँक 2.36 टक्के, खाजगी बँक 2 टक्के, ऑटो 1 टक्का घसरणीसह व्यवहार करत आहेत.

दरम्यान, गेल्या सत्रात जागतिक बाजारात मोठी घसरण झाली होती, त्यामुळे आज देशांतर्गत गुंतवणूकदार दबावाखाली आहेत. आशियाई आणि यूएस बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा नफा बुक करण्याकडे कल होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रॉफिट बुकिंगमुळे (Profit booking) बाजारात घसरण पाहायला मिळाली.

एलपीजी-सीएनजीच्या किंमती बदलणार! वाचा सविस्तर…

चलनवाढ आटोक्यात येईपर्यंत व्याजदरात वाढ करण्याचे संकेत अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. किरकोळ चलनवाढीचा दर 2 टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आणि शेवटच्या व्यवहारात मोठी घसरण झाली. प्रमुख शेअर बाजार DOW JONESने शनिवारी 3.03 टक्क्यांनी घसरला, तर S&P 500 3.37 टक्के आणि NASDAQ 3.94 टक्क्यांनी घसरला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.