Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेलला मोठा पर्याय; ५ रुपयात ६० किमी धावते ‘हि’ कार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : केरळमधील एका 67 वर्षीय व्यक्तीने अवघ्या 5 रुपयांत 60 किमीचा प्रवास करणारी इलेक्ट्रिक कार बनवली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या काळात स्वस्तात प्रवास होईल अशा वाहनांची गरज आहे.

कारचा कमाल वेग ताशी 25 किमी.

गॅरेजच्या मेकॅनिक्ससोबत मिळून त्यांनी इलेक्ट्रिक कारची डिझाईन केली आणि मेकॅनिक्ससोबत मिळून कार बनवण्याचे काम सुरू केले. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अँटोनी यांची मेहनत रंगली आणि त्यांची इलेक्ट्रिक कार तयार झाली. या कारचा कमाल वेग ताशी 25 किलोमीटर आहे आणि त्यातील बॅटरीची रेंज 60 किलोमीटर आहे. बॅटरी घरीच चार्ज करता येते आणि ती पूर्ण चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अँटनी यांनी सांगितले की, ही इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी 4.5 लाख रुपये खर्च झाले आहेत.या कारमध्ये सामान्य कारप्रमाणे स्टीयरिंग, ब्रेक, क्लच, एक्सीलरेटर, हेडलाइट्स आणि इंडिकेटर यांसारखी सर्व फीचर्स आहेत. ड्रायव्हिंग सीटच्या मागे दोन लोकांसाठी बसण्याची जागा आहे.

डिझाइन केलेल्या कारची स्टोरी शेअर केली

या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही कार केवळ 5 रुपयांमध्ये 60 किलोमीटर धावू शकते. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या अँटोनी जॉन यांनी या कारची निर्मिती केली आहे. त्यांनी आपल्या घरी इलेक्ट्रिक कार डिझाईन केली असून ती तयार करण्यासाठी त्यांना साडेचार लाख रुपये खर्च आला आहे. या गाडीत 2-3 जण बसू शकतात. मल्याळम यूट्यूब चॅनलने अँटोनी जॉन यांनी डिझाइन केलेल्या कारची स्टोरी शेअर केली आहे. असे सांगण्यात आले आहे की करिअर सल्लागार अँटोनी जॉन यांना त्यांच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी दररोज 60 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. ऑफिसला जाण्यासाठी ते इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असे. मात्र कडक ऊन, पाऊस अशा खराब हवामानात त्यांना इलेक्ट्रिक स्कूटरवरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.