Take a fresh look at your lifestyle.

आसाममध्ये अचानक आला पूर! 25 हजार लोकांना फटका; तर भूस्खलनात 3 जणांचा मृत्यू

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

आसाम – आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आसाम मधून समोर येत आहे. आसाम मधील दिमा हासाओ जिल्ह्यात दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) शनिवारी रात्री जारी केलेल्या बुलेटिननुसार, दिमा हासाओच्या हाफलांग क्षेत्रात एका महिलेसह तीन जणांना आपला जीव गमवावा लागला.

रेशन दुकानदारांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, उचललं मोठं पाऊल

राज्याच्या इतर भागांशी रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यामुळे अनेक ठिकाणी अचानक पूर आणि भूस्खलनामुळे डोंगरी जिल्ह्याला फटका बसला आहे. एएसडीएमएने सांगितले की, न्यू कुंजांग, फ्यांगपुई, मौलहोई, नामजुरांग, दक्षिण बागेतर, महादेव टिला, कालीबारी, उत्तर बागेतर, सीऑन आणि लोदी पांगमौल या गावांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे. येथील सुमारे 80 घरे बाधित झाली आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, जटिंगा-हरणगाजाव आणि माहूर-फाइडिंग येथील रेल्वे मार्ग भूस्खलनामुळे विस्कळीत झाला. गेरेमलांब्रा गावातील मायबांग बोगद्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी दरड कोसळल्याने रस्ता बंद झाल्याची शक्यता आहे. ASDMA सांगितले की, आसाममधील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे 25,000 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका कचर क्षेत्राला पडला आहे, ज्यामध्ये 21,000 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. त्यानंतर कार्बी आंग्लॉन्ग वेस्टमध्ये सुमारे 2,000 लोक आणि धेमाजीमध्ये 600 हून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.

BREAKING! महाराष्ट्रातील ‘या’ बँकेच्या ग्राहकांना RBI कडून पैसे काढण्यावर बंदी; ग्राहकांच्या पैशाचं आता काय होणार?

दोन जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या एकूण दहा मदत छावण्या आणि वितरण केंद्रांमध्ये किमान 227 लोक आश्रय घेत आहेत. लष्कर, निमलष्करी दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), नागरी प्रशासन आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांनी कचर आणि होजई जिल्ह्यांमधून सुमारे 2,200 लोकांना वाचवले. दुसरीकडे गुवाहाटीच्या विविध भागांतून पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. ASDMA ने कचर, करीमगंज, धेमाजी, मोरीगाव आणि नागाव जिल्ह्यांसाठी पुढील 12-72 तासांसाठी पुराचा इशारा जारी केला आहे.

मोठी बातमी! क्रिकेटविश्वाला मोठा झटका! प्रसिद्ध क्रिकेटपटूचा कार अपघातात मृत्यू

Comments are closed.