Take a fresh look at your lifestyle.

‘या’ प्रकरणी अफजल खानबाबत सुधीर मुनगंटीवारांचे सूचक विधान

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. महाराजांच्या कर्तृत्वाचा वारसा आजही तत्कालीन गडकिल्ल्यांच्या रूपात अस्तित्वात आहे, जिथे भेट दिल्यावर इतिहासाला जवळून अनुभवल्याची प्रचिती येते. नुकतेच राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अफजल खान या शिवरायांच्या तत्कालीन शत्रूबद्दल महत्वपूर्ण विधान केले आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानची कबर असून गेल्या काही दिवसांपासून ही जागा एका संस्थेला भाडेतत्वार देण्यात आली होती, त्यामुळे कबर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. राज्य सरकारने यंदाच्या शिवप्रताप दिनी अफजल खान याच्या कबर परिसरात आजवर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून टाकले आहे.

‘या’ दोन मोठ्या व्यक्तींच्या पत्नींना मिळणार निवडणूक लढविण्याची संधी; गुजरात आणि उत्तरप्रदेश मधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

नेमक्या याच प्रकरणी भाष्य करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “शिवाजी महाराज आणि स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफजल खानची कबर, त्याभोवती करण्यात आलेले अतिक्रमण व या सर्वांमुळे अफजल खानच्या विचाराचे करण्यात येणारे उदात्तीकरण कदापि खपवून घेण्यात येणार नाही. अतिक्रमण हटवुन राज्याच्या स्वराज्यहितवादी सरकारकडून हा शिवरायांना मानाचा मुजरा आहे.”

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ७ महिन्यात पश्चिम रेल्वे विभागाने वसूल केला ११४ कोटींचा दंड

अफजल खान कबरेभोवती जागा भाडेतत्वार देणे व अवतीभोवती अतिक्रमण उभारणे याबाबतीत सुरुवातीपासून जनतेत नाराजी होती. अनेकदा याबाबतीत आंदोलने देखील करण्यात आली होती. परिणामी मुद्दा न्यायालयात सुद्धा गेला होता, परंतू नुकतेच राज्य सरकारने या परिसरातील संपूर्ण अतिक्रमण हटविल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदर कारवाईचा राज्य सरकारला अभिमान असून भविष्यात असल्या प्रकारच्या कुठल्याही स्वराज्यद्रोही कारवाया कदापि खपवून घेतल्या जाणार नाही, असा सज्जड दम याप्रसंगी बोलताना मुनगंटीवारांनी दिला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.