Take a fresh look at your lifestyle.

भविष्यात ‘मिहान’ला सुगीचे दिवस येणार : नितीन गडकरी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे (वेद) उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी टाटा सन्सचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात गडकरींनी नमूद केले आहे की, टाटा उद्योग समूहाच्या विस्तारासाठी मिहान हे योग्य ठिकाण आहे, त्यामुळे टाटा समूहाने आपल्या इतर प्रकल्पांसाठी मिहानचा विचार करावा. टाटाचा एअरबस प्रकल्प नागपुरात येणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केली होती. त्यामुळे नजीकच्या काळात मिहानला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.

पुढचे ‘इतके’ दिवस धो-धो कोसळणार; 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

चंद्रशेखरन यांना लिहिलेल्या पत्रात गडकरींनी मिहानमध्ये सध्या सुरू असलेल्या दोन प्रकल्पांचा उल्लेख केला आहे. ‘टाल’ आणि ‘टीसीएस’ असे दोन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. औद्योगिक विस्तारासाठी मिहानमध्ये अनुकूल वातावरण असून त्यासाठी टाटा समूहाला भविष्यात या जागेचा विचार करता येईल, असेही गडकरींनी पत्रात नमूद केले आहे. तसेच वेदाचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनीही नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून मिहानमध्ये गुंतवणूक करणे किती फायदेशीर आहे, याकडे लक्ष वेधले आहे.

गुलाबी हिरा ठरतोय प्रमुख आकर्षण; जगाचे लक्ष वेधून घेणारा चक्क ४१३ कोटींचा हिरा

नागपुरात, सरकारने मिहान (मल्टी-मॉडल हब विमानतळ) येथे विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) विकसित केले आहे. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांकडे येथे भरपूर जमीन आहे, जी व्यवसाय वाढीसाठी योग्य आहे. अनेक ऑनलाइन मार्केटिंग कंपन्यांची येथे गोदामे आहेत. टाटा समूहाच्या विविध कंपन्यांसाठी (टाटा मोटर्स, ग्राहकोपयोगी वस्तू, टाटा शाळा) ही स्थिती अनुकूल आहे. सहा राज्यांमधील 350 जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी, कमी जमिनीचे दर, मनुष्यबळ आणि गोदाम तसेच रस्ते, रेल्वे आणि हवाई कनेक्टिव्हिटीचाही फायदा होऊ शकतो, असे माहेश्वरी यांनी म्हटले आहे.

आरबीआय लवकरच लाँच करणार ई-रुपया; फायदे धोक्यांबद्दल दिले स्पष्टीकरण

एअर इंडियाचे MRO मिहान येथे आधीच कार्यरत आहे, टाटा समूहाची मोहीम आणि दूरदृष्टी पाहता, मिहानमध्ये आणखी MROची योजना आखली जाऊ शकते. कारण MRO साठी रनवे कनेक्टिव्हिटी येथे आधीच अस्तित्वात आहे. टाटा समूह विमान वाहतुकीसाठी मोठ्या गोदामांची योजना करू शकतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. या संदर्भात वेदचे शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यास इच्छुक आहे. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल ही नागपुरातील २७ वर्षे जुनी NGO असून विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी काम करते हे येथे उल्लेखनीय आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.