गुगल आणि अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान; भारताबद्दल काढले गौरवोद्गार
ओटीटी न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हल्ली माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जाळे जगभरात विस्तृत झाले असून यामागे गुगल या माहिती तंत्रज्ञान कंपनीचा मोठा हातभार आहे. जगभरातील अनेक देशात गुगलचे कार्यालय स्थापित असून, यामध्ये भारत हा देश प्रमुख मानल्या जातो. सध्या गुगल कंपनीमध्ये भारतीय व्यक्तीकडे महत्वाच्या पदाची सूत्रे दिल्या गेली असून, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सुंदर पिचाई हे गुगल आणि तिची सहकारी कंपनी अल्फाबेटच्या सीईओ पदी कार्य करत असून, गेल्या काही वर्षांपासून ते यशस्वीपणे ही जबाबदारी सांभाळतआहे. नुकतेच भारत सरकारकडून सुंदर पिचाई यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी तिसऱ्या क्रमाचा समजल्या जाणारा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जनतेला महागाईतून दिलासा मिळण्याची शक्यता; पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार!
सुंदर पिचाई यांनी भारतीय -अमेरिकन व्यापार आणि उद्योग श्रेणीत उकृष्ट आणि वाखाणण्याजोगे कार्य केल्यामुळे भारताचे अमेरिकेतील राजदूत तरुणजीत सिंह संधू यांच्याकडून सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गुगलचे सीईओ सुदंर पिचाई यांनी आजवर गुगलच्या सर्व सेवांना विविध देशातील जनतेपर्यंत पोहचवतना अनेक महत्वपूर्ण सुधारणा आणि नवीनीकरणाच्या दृष्टीने बदल घडवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. याचाच परिणाम बघता आजवर गुगलचे सर्च इंजिन, गुगल पे, गुगल क्रोम, गुगल मॅप इत्यादी सेवा अद्ययावत स्वरूपात उपलब्ध होत आहे. भारत सरकराने सुंदर पिचाई यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
भारतीय राजदूत तरुणजीत सिंह संधू यांच्याकडून पद्मभूषण स्वीकारल्यानंतर सुंदर पिचाई भारावून गेले होते, भारत हा माझाच भाग आहे, तो मी माझ्याचजवळ ठेवतो, हा पुरस्कार स्वीकारताना मला मनस्वी आनंद होत आहे, असे यावेळी बोलताना पिचाई म्हणाले. भारत सरकारने दिलेल्या सर्वोच्च पुरस्कारासाठी मी भारत आणि भारतीयांचा आभारी आहे, मी जिथे जातो तिथे भारत माझ्यासोबत असतो, अशा शब्दात पिचाई यांनी भारताबद्दल गौरवोद्गार काढले. एकदंरीतच भारत आणि अमेरिका यांच्यात आर्थिक व्यवहार बळकट होण्याकरिता महत्वपूर्ण प्रयत्न केले जात असून, त्याकरिता तंत्रज्ञान महत्वाची भूमिका राखणार असे, भारतीय राजदूत संधू याप्रसंगी म्हणाले.