Take a fresh look at your lifestyle.

गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात ‘हा’ आरोपी हजर, तर्कवितर्कांना उधाण

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

जळगाव: भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दाऊदशी संबंधित असल्याचा आरोप करीत असताना भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नाला मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपीने लावलेली हजेरी चर्चेचा विषय झाली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हजारो लोकांना गंडा

जळगाव जिल्ह्यात भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील घोटाळा राज्यभर गाजला. जळगाव मुख्यालय असलेल्या या पतसंस्थेच्या राज्यात तसेच बाहेरच्या राज्यातही शाखा होत्या. सामान्यांच्या ठेवी ठेवून नंतर घोटाळ्यामुळे बुडालेल्या पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेला सुनील झंवर हा जामनेर येथे आमदार गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात दिसून आला. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! महाराष्ट्रातील ‘या’ गावात निघते जिवंत माणसाची प्रेतयात्रा!

संचालक अद्यापही फरार

संपूर्ण देशात गाजलेल्या ‘बीएचआर’ बँक घोटाळ्यामध्ये तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे व प्रमुख संशयित म्हणून सुनील झंवर यांची नावे समोर आली होती. झंवर याला नाशिक येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर बीएचआर बँकेत अनेक भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहाराने एके काळी प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बहुतांश संचालक अद्यापही कारागृहातच आहेत.

हेही वाचा – होळीच्या सणात रंगाचा बेरंग; धुळवडीत फुगा मारल्यानंतर रिक्षा उलटली, पहा थरारक व्हिडिओ….

झंवर, कंडारेंवर गुन्हे

यानंतर पतसंस्थेवर जितेंद्र कंडारे यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले; मात्र त्यांनी इतर दलालांना हाताशी धरून कोट्यावधींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. बीएचआर सहकारी संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी २७ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह व्यावसायीक सुनील झंवर यांचाही समावेश होता.

हेही वाचा – ‘द काश्मीर फाइल्स’ने मोडला ‘दंगल’चा रेकॉर्ड, आतापर्यंत केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

महाजनांच्या जवळचा कार्यकर्ता

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर झंवर हा फरार झालेला होता. त्याचे जामीनअर्ज अनेकदा नाकारण्यात आले होते. दहा ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे पोलिसांनी सुनील झंवर याला नाशिक येथून अटक केली होती. यानंतर त्याचा जामीनअर्ज अनेकदा नाकारण्यात आला होता. तथापी, सुनील झंवर याला 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. तो आज महाजन यांच्या मुलीच्या लग्नात दिसून आला. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. झंवर हे आमदार गिरीश महाजन यांचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नात ते मंडपात दिसून आले.

हेही वाचा – सोन्याची झळाळी उतरली, नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण!

महाजनांवर आरोप

बीएचआर घोटाळ्यात महाजन यांच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आले होते. महाजन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचाचाही आरोप होता. भाजप-शिवसेनेच्या सत्तेच्या काळात बीएचआर घोटाळ्याचा तपास संथगतीने होता, असाही आरोप केला गेला. त्याला महाजन जबाबदार असल्याचा आरोप होता.

Leave A Reply

Your email address will not be published.