Take a fresh look at your lifestyle.

शपथपत्र लिहून देणारे शाखाप्रमुख शिंदे गटाकडे निघाले, शिवसेनेची भिंतही कोसळली!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – शिवसेनेत बंड पुकारून एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये येण्यासाठी शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी रांग लावली आहे. पण, दुसरीकडे आता शाखाप्रमुख (shivsena shakha pramukh) सुद्धा शिंदे गटात सामील होण्यासाठी निघाले आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये मध्यरात्री खलबतं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या बंडानंतर आता मुंबईतले शाखाप्रमुख त्याच मार्गावर चाललेत का? असा प्रश्न उपस्थितीत व्हावा अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. आज एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मागाठणे मतदारसंघातील शाखाप्रमुख आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे स्थानिक विभाग प्रमुखांकडे दिले आहेत.

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सोबत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याच शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेतली होती. त्याला दहा दिवसही होत नाही तोच. त्याच शिवसैनिकांनी राजीनामा सत्र सुरू केलंय. आज मागाठणे विधानसभा मतदार संघात आमदार प्रकाश सुर्वे यांची जल्लोषात मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत हे सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी होणार असलेल्याचीही माहिती मिळत आहे.

राज्यात पावसाचे थैमान!; मुंबई, ठाण्याला ऑरेंज, तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी

दरम्यान, शंभूराज देसाई बऱ्याच दिवसानंतर सातारा जिल्ह्यातील आपल्या मतदार संघात आल्यावर पत्रकार परिषद घेत झालेल्या घटनेचा वृत्तांत दिला. ते म्हणाले आम्ही गद्दार नाही 15 लोकांची शिवसेना (shiv sena rebel) की 41लोकांची हे त्यांनी ठरवावे असे म्हणत देसाईंनी ठाकरे घराण्यावर टीका केली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.