Take a fresh look at your lifestyle.

एकनाथ शिंदेंसारख्या नेत्याला मुख्यमंत्री केल्याचं सुप्रिया ताईंना पटलेलं नाही – गोपीचंद पडळकर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारच राज्यात राजकीय बदल घडवून आणू शकतात, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. आपले वडीलच राज्याचे राजकारण बदलू शकतात, असे त्यांना वाटते. त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढली हे त्यांना समजले नाही. भाजपने सामान्य माणसाला संधी दिली. सुप्रिया ताईंना एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्याला मुख्यमंत्री केले हे पटत नसल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेली बुलेट गाडी शोधण्यात यश

अजितदादा पवार फुटले तेव्हा त्यांच्या मागे दोन आमदारही राहिले नाहीत, एकनाथ शिंदे यांच्या मागे ५० आमदार आहेत. सुप्रिया सुळे यांना हे पटले नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्याचा टोला पडळकर यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. चांगले काम करत आहे. ते हे सहन करणार नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगले निर्णय घेत आहेत. राज्यातील जनतेच्या हितासाठी ते काम करत आहेत. त्यांचे काम राष्ट्रवादीला मान्य नसल्याचेही पडळकर म्हणाले.

समर्थ फार्मसी महाविद्यालयात ‘जी पॅट’ परीक्षा संदर्भात कार्यशाळा आयोजित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. चांगलं काम करत आहेत. हे यांना सहन होईना. राज्यातील जनतेच्या हिताचं काम ते दोघेही करत आहेत. त्यांचं हे काम राष्ट्रवादीला पटत नाहीये, हे सगळं द्वेषातून होतंय, असंही ते म्हणालेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.