Take a fresh look at your lifestyle.

‘स्वेन्स्का इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ संस्थेचे नागपुरात थाटामाटात उद्‌घाटन; अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : भारताच्या मध्यभागी असलेल्या नागपुर शहरात वसलेली ‘स्वेन्स्का इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही कौशल्यआणि क्षमता विकसित करणारी संस्था आहे, जी प्लेसमेंटच्या (रोजगार) बाबतीत अतुलनीय सिद्ध होत आहे. ‘स्वेन्स्का इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे सर्व विद्यार्थी २००७ पासून विविध ठिकाणी उच्चपदस्थ आहेत. त्यामुळेच ही संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्किल इंडिया’ मोहिमेच्या प्रचार प्रसाराच्या दृष्टीने एक आदर्श आणि प्रातिनिधिक उदाहरण बनली आहे. ही संस्था अलिकडेच गोव्यातून नागपूरला स्थलांतरित झाली. काल दिनांक ७ ऑक्टोबर रोजी तिचे उद्घाटन झाले आहे. या नियोजित उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती दर्शविली.

‘PFI’ संबंधित अज्ञात व्यक्तीने भाजप आमदाराला केले टार्गेट; धमकीचे पत्र प्राप्त

स्वेन्स्का इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही बांधकाम उपकरणे आणि अवजड व्यावसायिक वाहनांची देखभाल करण्यासंबंधीच्या क्षेत्रातील कौशल्य आणि सक्षमता विकास करण्यासाठी पूर्णतः समर्पित असलेली एकमेव संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेकडे अंडर ग्रॅज्युएट्स, डिप्लोमामधील फ्रेशर्स आणि इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स, तसेच देशभरातील आयटीआय मधील विविध ट्रेड्सचे विद्यार्थी आहेत. ‘स्वेन्स्का इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून आजवर प्रशिक्षण घेऊन गेलेल्यांपैकी जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी परदेशात नोकरी करत आहेत, तर इतरांना भारतात विविध ठिकाणी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या व चांगली पदे प्राप्त झाली आहेत.

आरबीआय लवकरच लाँच करणार ई-रुपया; फायदे धोक्यांबद्दल दिले स्पष्टीकरण

बांधकाम उपकरणे आणि अवजड व्यावसायिक वाहने चालवण्यासाठीच्या तसेच त्यांची देखरेख करण्यासाठीच्या कुशल मनुष्यबळाची देशात प्रचंड कमतरता आहे. ‘स्वेन्स्का इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ ही भारतातील अशी एकमेव संस्था आहे. जिथे या क्षेत्रातील मनुष्यबळाचे कौशल्य आणि सक्षमता विकसित करण्याचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये, विशेषतः राष्ट्रीय महामार्गाने २०२० या आर्थिक वर्षात १५ टक्के वाढ नोंदवल्यामुळे कुशल मनुष्यबळाची कमतरता अधिकच जाणवत आहे.

पायाभूत सुविधा क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा मोठा हिस्सा असून, त्यात सुमारे १.७ लाख कोटींची उलाढाल आहे. ‘स्वेन्स्का इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे व्यवस्थापकीय संचालक मंगेश वैदय यांच्या म्हणण्यानुसार, बांधकाम उपकरणे आणि अवजड व्यावसायिक वाहने चालवण्यासाठीच्या आणि त्यांची देखभाल करण्यासाठीच्या कुशल तसेच सक्षम मनुष्यबळाची सध्या अतोनात कमतरता आहे. हजारो कोटींचे प्रकल्प उभारणारे अभियंते स्वतः ही यंत्रे हाताळू शकत नाहीत अथवा त्यांची देखभाल करण्याचे जानही त्यांच्याकडे नसते, उदाहरणार्थ विदयुत अभियंत्याची गरज असते, त्याचवेळी साध्या इलेक्ट्रिशियनचीही गरज असते.

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; महामंडळाच्या वाहतूक ताफ्यात इलेक्ट्रिक व सीएनजी बसगाड्या धावणार

वैदय याविषयी असे सांगतात की, “आता ज्या व्यक्ती बांधकाम उपकरणे आणि जड व्यावसायिक वाहने हाताळतात, चालवतात आणि त्यांची देखभाल करतात त्या सामान्यतः ते काम करता करताच या गोष्टी शिकलेले आहेत. करोडो रुपयांहून अधिक किमतीची असलेली ही यंत्रे चालवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ हे त्यामुळेच निम्न सामाजिक-आर्थिक स्तरातून आलेले आहे. काही प्रचंड मोठ्या प्रकल्पांमध्ये ही उपकरणे आणि वाहने दोन पाळ्यांमध्ये चालवली जात असल्याची शक्यताही आहे.. अशावेळी दिवसा मदतनीस म्हणून काम करणारेच रात्रीच्या शिफ्टमध्ये मशिनरी चालवतात आणि हळूहळू तेच ऑपरेटर बनतात, असेही होऊ शकते.” वैद्य पुढे असेही म्हणतात की “औपचारिक प्रशिक्षणाच्या अभावामुळे मेकॅनिक आणि तंत्रज्ञ देखील अशाच पद्धतीने तयार होतात. यंत्रसामग्री चालवणे आणि त्यांची देखभाल करणे काम करता करता शिकणे शक्य असले तरी, अशा व्यक्तीला मशिनरी कोणत्या परिस्थितीत सर्वोच्च क्षमतेने वापरली जाऊ शकते याची संपूर्ण माहिती नसते. त्याचप्रमाणे चालक आणि तंत्रज्ञ यांना ही मशीन्स हाताळण्यासाठी आखून दिलेल्या विशिष्ट कार्यपद्धतीचीही ( SOPs) माहिती असेलच असे नव्हे.

राज्य शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा; अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरच शिक्षक भरती

ज्या तरुणांना त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रमाणपत्र मिळवायचे आहे त्यांच्यासाठी मूळ उपकरण उत्पादकांसाठी (OEMS), कंत्राटदारांच्या मनुष्यबळासाठी आणि ऑपरेटर तसेच तंत्रज्ञ बनण्याची आकांक्षा असलेल्या शिकाऊ नवोदितांसाठी ‘स्वेन्स्का इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ प्रशिक्षणाची व्यवस्था करते. उपकरण उत्पादक अनेकदा त्यांच्या ग्राहकांना मर्यादित दिवसांचे प्रशिक्षण देतात, तथापि, हे प्रशिक्षण केवळ अनुभवी ऑपरेटरसाठी असते, शिकाऊ नवोदितांसाठी पायाभूत सुविधा क्षेत्रातील आश्चर्यकारक आणि वेगवान वाढीमुळे अनुभवी तसेच नवीन ऑपरेटर आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी सध्या भरपूर वाव आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या २० टक्के खर्च कंत्राटदार मशिनरींवर करतो. बांधकाम उपकरणे आणि यंत्रसामग्रीची यादी प्रकल्पाच्या आकारानुसार, त्याची गरज पाहून निश्चित केली जाते. २०२० मध्ये भारतात सुमारे एक लाख नवीन मशीन विकल्या गेल्या. प्रत्येक मशीनला एक ऑपरेटर आणि एक मदतनीस आवश्यक असतो. एक लाख मशीन्ससाठी दोन शिफ्टमध्ये काम सुरु आहे असे गृहीत धरले तर दोन लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. नवीन उपकरणांच्या खरेदीसाठी, देखभाल करण्यासाठी आणि प्रकल्प राबविताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी देखील अधिक कुशल तंत्रज्ञांची आवश्यकता असणार आहे.

महाराष्ट्र कुठे चालला आहे, उद्धव ठाकरेंनी याचे चिंतन करावे : देवेंद्र फडणवीस

शेवटी बोलताना वैद्य म्हणाले की, सध्याची परिस्थिती बदलण्याचा उपाय हा मनुष्यबळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यातच असू शकतो. मनुष्यबळाकडे सामान्य म्हणून न पाहता मालमत्ता किंवा गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. सामुग्री साहजिकच ठराविक कालावधीत संपुष्टात येते, मालमतेमुळे मात्र लाभ मिळत राहतात. मालमत्तेचा फायदा घेणे आवश्यक आहे, अन्यथा ती मृत सामुयी ठरते. तरुणांची मोठी लोकसंख्या ही भारताची ताकद असल्याने, वैदय आणि त्यांच्या पत्नी मीता वैद्य यांना असा ठाम विश्वास आहे की, आपण कुशल आणि सक्षम ऑपरेटर आणि तंत्रज्ञ तयार केले तर भारत हा अशा प्रकारचे मनुष्यबळ पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करू शकेल. “भारतासोबतच परदेशातही अशा कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. सरकारच्या पाठिंब्याने आणि संस्थापकांच्या दृढनिश्चयाच्या बळावर ‘स्वेन्स्का इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उद्याच्या उत्तम भारतासाठी युवकांना कुशल बनवण्यात आपली क्षमता सिद्ध करण्याचे महत्वाचे काम करणार आहे, असा विश्वास यावेळी व्यवस्थापकीय संचालक वैदय यांनी व्यक्त केला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.