Talathi Bharati 2022-23 : तलाठी भरतीला मंजुरी पहा उपलब्ध जागा व पगार

0

तलाठी भरती बाबत राज्य शासनाकडून शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. 

या लेखामध्ये आपण खालील माहिती पाहणार आहोत. 

  • तलाठी पगार किती असतो 
  • तलाठ्याची कामे 
  • 2022-23 मध्ये तलाठी भरती साठी उपलब्ध पदे 

तलाठी यांच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात सामान्यतः एक ते चार गावांचा मिळून तलाठी साझा झालेला असतो.

तलाठी हा महसूल विभागाच्या विभागामध्ये ग्राम पातळीवर काम करणारा शासनाचा  कर्मचारी असतो. आपण कधी ना कधीतरी सातबारा, land record फेरफार पत्रक, किंवा इतर बाबींसाठी निश्चितपणे तलाठी यांच्याशी कधी ना कधी तरी संपर्क केला असेल.

तलाठी भरती जिल्ह्यानुसार उपलब्ध जागा येथे पहा

तलाठी पगार किती असतो

तलाठ्यांना सातवे वेतन 7th pay commission आयोगानुसार पगार मिळत असते. जेव्हा तुम्ही तलाठी म्हणून जॉईन  होतात तेव्हा तुम्हाला सुरुवातीला तुमच्या पगारातून 25 हजार पाचशे रुपये ही तुमची बेसिक salary असते जी दरवर्षी तीन टक्‍क्‍यांनी वाढत असते.

तलाठ्याची कामे

गाव नमुना 1 ते 21 पर्यंतचे सर्व अभिलेखे अद्यावत ठेवणे 

महसुलाची थकबाकी व इतर रकमांची वसुली करणे 

निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीची कामे मतदार याद्या तयार करणे

महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल विभागाचे तलाठी ग्रामस्तरावरील महत्त्वाचे अधिकारी आहेत.

महसूल प्रशासनातील सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे तलाठी होय.

तलाठ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 1966 प्रमाणे कार्य करावी लागतात. तलाठ्यांना महसुली अभिलेखे ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे करायची असतात.

तलाठी भरती जिल्ह्यानुसार उपलब्ध जागा येथे पहा

Leave A Reply

Your email address will not be published.