Take a fresh look at your lifestyle.

तळेगाव सेवा सोसायटी निवडणूक; प्रचार युद्ध रंगले

0

हरिभाऊ दिघे, ओटीटी न्यूज नेटवर्क

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या तळेगाव दिघे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत बिरोबा शेतकरी विकास मंडळ विरुद्ध सिद्धेश्वर शेतकरी विकास मंडळात लक्षवेधी दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत दोन्ही मंडळात प्रचार युद्ध चांगलेच रंगले आहे. एकमेकांविरुद्ध आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या असून सोशल मिडीयावर प्रचाराचे घमासान सुरु आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व मानणाऱ्या गावपातळीवरील दोन गटात ही लढत होत आहे.

तळेगाव दिघे विविध कार्यकारी सोसायटीची १३ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, सोसायटीचे माजी भाऊसाहेब दिघे व छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे यांच्या नेतृत्वाखालील बिरोबा शेतकरी विकास मंडळ विरुद्ध संगमनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव दादा दिघे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे, माजी सरपंच तात्यासाहेब दिघे व माजी उपसरपंच अनिल कांदळकर यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर शेतकरी विकास मंडळ यांच्यात लक्षवेधी दुरंगी लढत होत आहे.

तळेगाव सोसायटी निवडणूकीत १३ जागांसाठी १ हजार ३९९ इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोन्ही मंडळांनी सोसायटी निवडणूक जिंकण्यासाठी ‘साम-दाम-दंड-भेद’ नीतीचा वापर सुरू केला आहे. निवडणूक लढविणार्‍या दोन्ही मंडळाच्या उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जावून प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रचार युद्ध रंगले आहे.

सदर निवडणुकीत बिरोबा शेतकरीचे सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघात : विलास रामनाथ जोर्वेकर, अण्णासाहेब संपत दिघे, कारभारी गणपत दिघे, केरू कारभारी दिघे, पांडुरंग बाबुराव दिघे, रमेश भाऊसाहेब दिघे, रामदास पुंजा दिघे, विठ्ठल भागुजी दिघे विरुद्ध सिद्धेश्वर शेतकरीचे उमेदवार : अण्णासाहेब चांगदेव दिघे, गोरक्ष सूर्यभान दिघे, तातू पंढरीनाथ दिघे, रवींद्र कान्हुबा दिघे, रामनाथ कारभारी दिघे, ज्ञानदेव भागुजी दिघे, रामदास लक्ष्मण भागवत व दगू यासीन शेख निवडणूक रिंगणात आहेत.

अनुसूचित जाती जमाती मतदार संघात बिरोबा शेतकरीचे उमेदवार रावसाहेब हरिभाऊ जगताप विरुद्ध सिद्धेश्वर शेतकरीचे उमेदवार आत्माराम संतु जगताप हे निवडणूक रिंगणात आहेत. प्रकाश माधव इल्हे हे स्वतंत्र उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. इतर मागास प्रतिनिधी मतदार संघात बिरोबा शेतकरीचे उमेदवार अरुण प्रभाकर कदम यांच्याविरुद्ध सिद्धेश्वर शेतकरीचे उमेदवार रावसाहेब बाबुराव जाणेकर हे निवडणूक रिंगणात आहेत.

महिला राखीव मतदारसंघात : बिरोबा शेतकरीच्या उमेदवार पद्मा बाळासाहेब दिघे, लहानबाई साहेबराव दिघे यांच्याविरुद्ध सिद्धेश्वर शेतकरीच्या उमेदवार अरुणा नवनाथ दिघे, ताराबाई रामनाथ दिघे या निवडणूक रिंगणात आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात : बिरोबा शेतकरीचे उमेदवार रमेश देवराम कांदळकर यांच्याविरुद्ध सिद्धेश्वर शेतकरीचे उमेदवार भागवत पर्वत कांदळकर हे निवडणूक रिंगणात आहेत. रविवार (दि. २७) तळेगाव सोसायटीच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणुकीत १ हजार ३९९ मतदार दोन्ही मंडळांच्या उमेदवारांची भवितव्य ठरविणार आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही मंडळांच्या नेत्यांनी रणनीती आखली असून एकमेकांना चीतपट करण्यासाठी डावपेच सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.