Take a fresh look at your lifestyle.

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : टाटा एअरबस हा सी -२९५ लष्करी ट्रान्सपोर्ट एअरपोर्ट प्रकल्प गुजरातला हलविल्याने राज्य सरकारवर चहुबाजूने टीकेची झोड उठत आहे. सुमारे २२ हजार कोटींचा हा प्रकल्प टाटा व एअरबसच्या सहकार्याने उभारल्या जाणार होता. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची होणार होती. यापूर्वी वेदांत फॉक्सकॉन हा दिढ लाख कोटींचा प्रकल्प ऐनवेळी गुजरातला हलविण्यात आला होता. त्यामुळे एकामागून एक प्रकल्प महाराष्ट्रातून निसटून जात गुजरातच्या घशात घालण्याचे कार्य सुरु असल्याने केवळ राजकीयच नव्हे तर समाजातील सर्वच स्तरातून सरकारवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

वादग्रस्त विधान प्रकरणी समाजवादी पक्षनेते आझम खान यांना ३ वर्षांची शिक्षा

सदर प्रकरणी ब्राम्हण महासंघाच्या आनंद दवे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे व म्हटले की, “थेट महाराष्ट्रच गुजरातेत विलीन करा. क्रमांक एकवरील महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर जात आहे मात्र सगळे राजकारणात दंग आहे. बाकरवडी आणि ढोकळा एकत्र करा.” अशा प्रकारे तीव्र संताप आनंद दवे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंतांनाच सवाल केला आहे.

मनसे व ठाकरे गटात शाब्दिक खडाजंगी; बेडूक व सरडा प्राण्यांची उपमा देत साधले परस्पर शरसंधान

आतापर्यंत ४ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेले त्यामुळे आता तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले, खोके सरकारने अजून एक प्रकल्प गुजरातेत नेला. सदर प्रकल्पासाठी आपण जुलै महिन्यापासून पाठपुरावा करत होतो, असेही ते यावेळी म्हणाले.

असदुद्दीन ओवैसीला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर; हिजाब मुद्द्यावरून घेरले

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, लोकांमध्ये संभ्रम पसरविण्याशिवाय विरोधक काहीच करू शकत नाही. एक वर्षांपूर्वीच हा प्रकल्प गुजरातला नेण्याचे ठरले होते त्यावर आता चर्चा करून काहीच फायदा नाही. मागच्या सरकारने याकरिता कुठलाही पत्र व्यवहार किंवा इतर मार्गाने संपर्क केला नाही. मात्र आम्ही राज्यातील युवा पिढीला वाऱ्यावर सोडून न देता या पेक्षा मोठा प्रकल्प राज्यात उभारू.

एकंदरीतच एकामागे एक विविध प्रकल्प गुजरात मध्ये हलविण्यात येत असताना दर वेळी राज्य सरकारचे एकच उत्तर मिळत आहे परंतू मोठा प्रकल्प नेमका कधी राज्यात उभारल्या जाईल व याचा युवा पिढीला फायदा होईल याचीच जनतेला प्रतीक्षा आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.