Take a fresh look at your lifestyle.

Tata ग्रुपच्या ‘या’ कंपनीमुळे गुंतवणूकदार कोट्याधीश; 17 रुपयांचा शेअर तब्बल 8600 रुपयांवर

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई -share price tata power सध्या शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. अनेक मोठे गुंतवणूकदार लाँग टर्ममध्ये ट्रेड करतात आणि चांगला नफा देखील कमावतात. शेअर मार्केटमध्ये आज पैसे टाकले आणि डबल झाले पाहिजे या मानसिकतेतून ट्रेडिंग केलं तर अनेकदा नुकसानचं होतं. त्यामुळे टाटा समूहाच्या एका कंपनीने (Tata Group Companies) गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. टाटा समूहाची ही कंपनी Tata Elxsi आहे.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट; वाचा संपूर्ण आठवड्याचं हवामान एका क्लिकवर

Tata Elxsi च्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना जवळपास 50,000 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 17 रुपयांवरून 8600 रुपयांपर्यंत वाढले आहेत. Tata Elxsi च्या शेअर्सनी यावर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 47 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 9,420 रुपये आहे. tata motors shares

झटपट पर्सनल लोन हवं आहे का? मग या महत्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवाच

1 लाख सुमारे 5 कोटी रुपये

Tata Elxsi चे शेअर्स 21 सप्टेंबर 2001 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 17.55 रुपयांच्या पातळीवर होते. 6 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स NSE वर 8,680 रुपयांवर बंद झाले आहेत. Tata Elxsi च्या शेअर्सनी या कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास 50,000 टक्के परतावा दिला आहे.

वाह! आता फक्त ५,९९९ रुपयांमध्ये घरी आणा ‘हा’ HD LED TV; जाणून घ्या या बंपर सेलविषयी

जर एखाद्या व्यक्तीने 21 सप्टेंबर 2001 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 4.95 कोटी रुपयांच्या जवळपास गेले असते.

5 वर्षांत 1000 टक्क्यांहून अधिक परतावा –

Tata Elxsi च्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना 1,027 टक्के परतावा दिला आहे. 9 जून 2017 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर Tata Elxsi चे शेअर्स 770 रुपयांच्या पातळीवर होते. 6 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 8,680 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 9 जून 2017 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्याची रक्कम 11 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.