Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकार धोक्यात? काँग्रेसच्या गोटातून धक्कादायक माहिती समोर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाविकास आघाडी सरकारला (mva government) अडीच वर्ष पूर्ण झाली आहे. एकीकडे भाजपचे नेते सरकार पाडण्याचा मुहूर्त देत आहे. तर दुसकीकडे आता काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. काँग्रेसच्या 25 आमदारांनी (congress mla) नाराजी व्यक्त केली असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आमदार निधीवरून वाद पेटला आहे. अलीकडेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांनी निधी देण्याबाबत घोषणा केली आहे. पण, काँग्रेसच्या आमदार अजूनही नाराज आहे.
काँग्रेसचे 25 आमदार सरकारवर नाराज आहे. आपल्या व्यथा मांडण्यासाठी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. याबद्दल एक पत्रही सोनिया गांधींना लिहिण्यात आले आहे, असं वृत्त एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलं आहे.

इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारमधील काही मंत्री आपलं म्हणणं ऐकत नाही. काँग्रेसचे मंत्री सुद्धा आपलं ऐकत नाही. जर मंत्री आमदारांच्या मतदारसंघातील समस्येबाबत ऐकणार नसतील तर भविष्यात मतदारसंघात कसं काम करायचे? असा सवालच आमदारांनी उपस्थितीत केला आहे.

तसंच, पक्षामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. काँग्रेसचे मंत्री योग्य प्रकार आपली भूमिका मांडत नाही. प्रत्येक मंत्र्यांची आपल्या आमदारांची भूमिका मांडण्याची जबाबदारी आहे, पण ते कमी पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.