Take a fresh look at your lifestyle.

देशाला पुन्हा मराठमोळे सरन्यायाधीश लाभणार? पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी मंगळवारी (11 ऑक्टोबर) पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे लळीत यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. निवृत्त होताना सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत लळीतने चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवले.

राज्यातील ‘या’ सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; परवाना केला रद्द

विद्यमान सरन्यायाधीश लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले. नियमानुसार भावी सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस निवृत्तीच्या एक महिना आधी केंद्र सरकारकडे केली जाते.

सर्व सरन्याधीश लळित यांच्या नंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे लळित यांनी चंद्रचूड यांची केंद्राकडे मागणी केली आहे. लळित यांच्यानंतर देशाला पुन्हा एकदा मराठमोळे सरन्याधीश लाभणार आहे.

दिवाळीपूर्वीच डाळी महागल्या; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता

उदय लळित यांनी 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा असून ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर पुढील सरन्यायाधीशांचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 असा दोन वर्षांचा असेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

ऑन धिस टाईम मीडिया आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर आणि

इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ON THIS TIME (OTT) यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leave A Reply

Your email address will not be published.