Take a fresh look at your lifestyle.

‘या’ अभिनेत्रीच्या अडचणी कमी होईनात; पुन्हा बजावले समन्स

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही काळापासून मनी लाँड्रिंगप्रकरणात (Money laundering case) अडचणीत सापडली आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी जॅकलिनचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात तपास यंत्रणेने नुकतेच दुसरी सप्लीमेंट्री चार्जशीट (Supplementary Charge Sheet) दाखल केली होती. सोमवारी दिल्ली पोलिसांकडून जॅकलिनची चौकशी होणार होती, ती लांबणीवर टाकली. अशातच या प्रकरणाचा नवा ट्विस्ट पुढे आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग आघाडीचा महानगरपालिकेवर मोर्चा

दिल्ली EOW ने 200 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा तिसरे समन्स (Summons) बजावले आहे. यावेळी जॅकलिनला 14 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी 12 सप्टेंबरला आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र काही वैयक्तिक कामामुळे ती या कारवाईत सहभागी होऊ शकली नाही. त्यामुळे आता तिला 14 तारखेला नव्याने समन्स पाठवण्यात आले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.