Take a fresh look at your lifestyle.

मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होणार; गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून लॉटरी जाहीर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत घर घेणं हे सर्वसामांन्याच्या आवाक्यात राहिलेलं नाही. त्यामुळे सर्वसामांन्याचा कळ हा मुंबईनजीकच्या भागात घर घेण्याकडे असल्याचं दिसून येतंय. आपलं हक्काचं घर घेण्याच्या विचारात आणि तयारीत असलेल्यांसाठी मोठी गुडन्यूज आहे. गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

आज 4 हजार 158 घरांची आणि 245 व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली आहे. ॲानलाईन पध्दतीने ही लॅाटरी काढली जाणार आहे. सिडको महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलातील घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

वृद्धापकाळात देईल आर्थिक प्राप्ती ; एलआयसीची जीवन शांती

सिडको नवी मुंबई आणि पनवेल परिसरात एक लाख घरे उपलब्ध करणार असून आतापर्यंत जवळपास 25 हजार घरांची सिडकोने विक्री केली आहे. किमती आवाक्यात असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी सिडकोतील घरे ही सुवर्णसंधी मानली जाते. सिडको सतत विविध योजनांद्वारे घरे, भूखंड, दुकाने आणि कार्यालये (कमर्शियल प्रीमाईसेस) विक्री करते. त्यामुळे शहराच्या आर्थिक विकासाला मदत होण्याबरोबरच नवी मुंबईची व्यावसायिक क्षमता वाढत असून शहराच्या आर्थिक विकासालाही हातभार लागत आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमुक्त प्रवास करता येणार; राज्य सरकारचा निर्णय

नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडको गृहसंकुलातील 4 हजार 158 घरे महागृहनिर्माण योजनेंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या 4 हजार 158 परवडणाऱ्या घरांपैकी 404 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत आणि उर्वरित 3 हजार 754 घरे सर्वसाधारण वर्गासाठी उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये आणि अनुदानाची रक्कम 2 लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

महात्मा गांधींनंतर भारतीयांचे मन समजून घेणारे दुसरे नेते पंतप्रधान मोदी; ‘या’ मंत्र्यांचं मोठं विधान

या घरांचा समावेश असलेली गृहनिर्माण संकुले नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी आहेत. ही गृहसंकुले रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोने जोडलेली आहेत. आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.